शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायासाठी तरुणाई उतरली रस्त्यावर

By admin | Updated: December 13, 2015 23:45 IST

संत तुकारामनगर येथील जनरल मोटर्सचा व्यवस्थापक दीपक स्वामी चौधरी याने महिनाभरापूर्वी आत्महत्या केली.

पिंपरी : संत तुकारामनगर येथील जनरल मोटर्सचा व्यवस्थापक दीपक स्वामी चौधरी याने महिनाभरापूर्वी आत्महत्या केली. त्यांच्या जवळ सापडलेल्या चिठ्ठीवरून सासू-सासरे आणि पत्नीच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. साक्षी पुरावे असतानाही पोलीस कारवाई करीत नसल्याने, त्यामुळे या तरुणास न्याय मिळावा म्हणून मेन्स राइट असोसिएशनने घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात तरुणास मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहिली. महिला अत्याचाराच्या घटना नवीन नाहीत. परंतु, पत्नी आणि सासू-सासऱ्यांकडून पुरुषावर अत्याचार होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. पुरुषांना न्याय मिळावा म्हणून मेन्स राइट असोसिएशनची स्थापना झाली आहे. या संघटनेत उच्चशिक्षित तरुणांची संख्या अधिक आहे. दीपक चौधरी आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस व्यवस्थित करीत नसल्याने रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोरील चौकात मेणबत्त्या पेटवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी संघटनेचे अध्यक्ष महेश शिंदे, दीपकची आई सुनंदा चौधरी आणि बहीण रजनी राव, संघटनेचे प्रतिनिधी दीपक जोरवे, चेतन वर्मा, विशाल पाटील, चित्तरंजन निवर्गी, आनंद कानेटकर, प्रवीण पाटील, विलास दराडे, रवी लखनवी आदी उपस्थित होते. दीपकला मृत्यूनंतरही न्याय मिळवून देण्याची शपथ घेण्यात आली.महेश शिंदे म्हणाले, ‘‘तळेगाव येथील जनरल मोटर्समध्ये वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या दीपकने २४ नोव्हेंबरला आत्महत्या केली. पत्नी आणि सासू-सासऱ्यांच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याचे त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. साक्षी-पुरावे असतानाही पिंपरी पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. तपास अधिकारी बदलावा, अशी मागणी आम्ही सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्तांकडे केली होती. त्यानुसार अधिकारी बदलला. या प्रकरणास महिना होत आला, तरी पोलीस दाद देत नाहीत.’’ (प्रतिनिधी)पोलिसांची भूमिका संशयास्पदचौधरी आत्महत्याप्रकरणी पोलिसांची भूमिका संशास्पद आहे. पुरावे उपलब्ध असतानाही अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही. याबाबत १६ डिसेंबरला सुनावनी आहे. दरम्यानच्या कालखंडात दीपकच्या सासू-सासऱ्यांनी पोलिसांच्या मार्फत जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आरोपींना जामीन मिळू नये, दीपकचा मोबाइल, व्हॉट्स अ‍ॅपवरून केलेले संभाषण आणि त्यांच्याबरोबर सापडलेली चिठ्ठी असे अनेक पुरावे असतानाही गेली तीन आठवडे कारवाई झालेली नाही, असे शिंदे म्हणाले.