न्यायासाठी तरुणाई उतरली रस्त्यावर

By admin | Published: December 13, 2015 11:45 PM2015-12-13T23:45:43+5:302015-12-13T23:45:43+5:30

संत तुकारामनगर येथील जनरल मोटर्सचा व्यवस्थापक दीपक स्वामी चौधरी याने महिनाभरापूर्वी आत्महत्या केली.

The youth rose to justice on the road | न्यायासाठी तरुणाई उतरली रस्त्यावर

न्यायासाठी तरुणाई उतरली रस्त्यावर

Next

पिंपरी : संत तुकारामनगर येथील जनरल मोटर्सचा व्यवस्थापक दीपक स्वामी चौधरी याने महिनाभरापूर्वी आत्महत्या केली. त्यांच्या जवळ सापडलेल्या चिठ्ठीवरून सासू-सासरे आणि पत्नीच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. साक्षी पुरावे असतानाही पोलीस कारवाई करीत नसल्याने, त्यामुळे या तरुणास न्याय मिळावा म्हणून मेन्स राइट असोसिएशनने घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात तरुणास मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहिली.
महिला अत्याचाराच्या घटना नवीन नाहीत. परंतु, पत्नी आणि सासू-सासऱ्यांकडून पुरुषावर अत्याचार होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. पुरुषांना न्याय मिळावा म्हणून मेन्स राइट असोसिएशनची स्थापना झाली आहे. या संघटनेत उच्चशिक्षित तरुणांची संख्या अधिक आहे.
दीपक चौधरी आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस व्यवस्थित करीत नसल्याने रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोरील चौकात मेणबत्त्या पेटवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी संघटनेचे अध्यक्ष महेश शिंदे, दीपकची आई सुनंदा चौधरी आणि बहीण रजनी राव, संघटनेचे प्रतिनिधी दीपक जोरवे, चेतन वर्मा, विशाल पाटील, चित्तरंजन निवर्गी, आनंद कानेटकर, प्रवीण पाटील, विलास दराडे, रवी लखनवी आदी उपस्थित होते. दीपकला मृत्यूनंतरही न्याय मिळवून देण्याची शपथ घेण्यात आली.
महेश शिंदे म्हणाले, ‘‘तळेगाव येथील जनरल मोटर्समध्ये वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या दीपकने २४ नोव्हेंबरला आत्महत्या केली. पत्नी आणि सासू-सासऱ्यांच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याचे त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. साक्षी-पुरावे असतानाही पिंपरी पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. तपास अधिकारी बदलावा, अशी मागणी आम्ही सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्तांकडे केली होती. त्यानुसार अधिकारी बदलला. या प्रकरणास महिना होत आला, तरी पोलीस दाद देत नाहीत.’’ (प्रतिनिधी)
पोलिसांची भूमिका संशयास्पद
चौधरी आत्महत्याप्रकरणी पोलिसांची भूमिका संशास्पद आहे. पुरावे उपलब्ध असतानाही अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही. याबाबत १६ डिसेंबरला सुनावनी आहे. दरम्यानच्या कालखंडात दीपकच्या सासू-सासऱ्यांनी पोलिसांच्या मार्फत जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आरोपींना जामीन मिळू नये, दीपकचा मोबाइल, व्हॉट्स अ‍ॅपवरून केलेले संभाषण आणि त्यांच्याबरोबर सापडलेली चिठ्ठी असे अनेक पुरावे असतानाही गेली तीन आठवडे कारवाई झालेली नाही, असे शिंदे म्हणाले.

Web Title: The youth rose to justice on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.