पुणो : एकमेकांना शिवीगाळीतून झालेल्या हाणामारीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला. ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालावरून फरासखाना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
संतोष मनोहर सावंत (वय 35, रा. केदारी बिल्डिंग, बुधवार पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सुरेश गिरप्पा कांबळे (वय 39, रा. 296, बुधवार पेठ) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. कोळी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जून रोजी मध्यरात्री सावंत आणि कांबळे यांच्यामध्ये शिवीगाळ केल्याच्या कारणावरून भांडणो झाली होती. भांडणादरम्यान सावंत याला कांबळेने हाताने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, 12 जून रोजी श्रीकृष्ण सिनेमागृहाच्या आवारात पोलिसांना सावंत याचा मृतदेह आढळून
आला.
पोलिसांनी त्याचा मृतदेह ससूनमध्ये विच्छेदनासाठी पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केलेली होती. सावंतच्या पोटात आणि छातीमध्ये मोठय़ा प्रमाणावर रक्तस्राव झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाजवळील साक्षीदारांकडून माहिती मिळवून कांबळे याला अटक केल्याचे उपनिरीक्षक व्ही. एम. कोळी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)