शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लोहगावात युवकाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 20:14 IST

लोहगाव हरणतळ्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा लोहगाव येथे बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.

ठळक मुद्देछुट्टू लोहगाव हरणतळेवस्ती येथे वीटभट्टीवर काम करत होता.

विमाननगर : मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा लोहगाव येथे बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत छुट्टू उर्णव (वय ३०, मूळ रा.झारखंड सध्या रा. हरणतळेवस्ती, लोहगाव) याचा मृत्यू झाला. विमानतळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, छुट्टू  हा लोहगाव हरणतळेवस्ती येथे वीटभट्टीवर काम करत होता. गुरुवारी दुपारी तो मित्रांसोबत हरणतळ्यात मासे पकडण्यासाठी गेला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्यामुळे त्याचे मित्र व नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शुक्रवारी सकाळी हरण तळ्याजवळ त्याचा शर्ट सापडला. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव व कर्मचारी यांनी जाऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हरणतळ्यात छुट्टूचा शोध घेण्यास सुरुवात केली. गळ टाकून व नंतर बोटीने त्याचा शोध सुरू होता. अखेरीस जवांनानी थेट तळ्यात उतरुन दुपारी साडे बाराच्या सुमारास छुट्टूचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मुख्य अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी विजय भिलारे,फायरमन मनिष बोंबले,महेंद्र सकपाळ,दिगंबर बांदिवडेकर,जवान तानाजी मांजरे,सुधीर नवले,विजय पिंजण,अरुण गायकर, वाहनचालक करीम पठाण यांनी हरण तळ्यातील बुडालेल्या छुट्टूचा मृतदेह बाहेर काढला.शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रूग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Lohgaonलोहगावpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPolice Stationपोलीस ठाणेfire brigade puneपुणे अग्निशामक दल