पोलिसांवर आरोप करीत तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 03:40 AM2019-03-12T03:40:22+5:302019-03-12T03:40:29+5:30

एकाला अटक; सहायक आयुक्तांमार्फत चौकशी

Youth commits suicide by accusing police | पोलिसांवर आरोप करीत तरुणाची आत्महत्या

पोलिसांवर आरोप करीत तरुणाची आत्महत्या

Next

पुणे : कर्जबाजारी असलेल्या तरुणाने जमीन व्यवहारात तक्रार घेतली नसल्याचा आरोप करणारी चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निल दशरथ सपकाळ (वय ३३, रा़ गोंधळेनगर, हडपसर) असे त्याचे नाव आहे़ सपकाळ याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात त्याने प्लॉट देऊन फसवणूक करणारा, हडपसर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्यावर आरोप करून त्यांना सोडू नका, असे या चिठ्ठीत म्हटले आहे़ याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून राजेंद्र बाळासाहेब मोरे (रा़ फुरसुंगी गाव) याला अटक केली आहे़ तर पोलीस अधिकाऱ्यांची सहायक पोलीस आयुक्तांमार्फ चौकशी करण्यात येणार आहे.

हडपसर पोलिसांनी सांगितले की, हे सर्व २०१७मधील प्रकरण असून त्याच वेळी सपकाळ यांच्या अर्जाची चौकशी करून त्यांना ही दिवाणी बाब असल्याने आपण न्यायालयात जावे, अशी समज दिली असून, त्या समजपत्रावर त्यांची सहीसुद्धा आहे. याबाबतची माहिती अशी, स्वप्निल सपकाळ हे गोंधळेनगर येथे रहात असून त्यांना एक मुलगी आहे़ त्यांची पत्नी सध्या गर्भवती आहे़ रविवारी दुपारी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली़ त्याअगोदर त्यांनी पोलिसांना एक व्हॉटसअपही केला होता़ त्यांच्या घरात एक चिठ्ठी सापडली़ त्यात त्यांनी आपल्या घरांच्या भावनिक पत्र लिहिले असून त्यात त्याने सर्वांची माफी मागितली आहे़ हे सर्व माझ्यामुळे झाले असल्याचे त्याने म्हटले आहे़ शेवटी त्याने तिघांची नावे लिहिली असून त्यांना सोडू नका असे म्हटले आहे.

स्वप्नील सपकाळ याने २०१६ मध्ये राजेंद्र मोरे याच्याकडून प्लॉट घेतला होता़ त्यासाठी कर्ज काढले होते़ त्या प्रकरणात आपली फसवणूक झाली असून मोरे यांनी दिलेले चेक न वटता परत आले़ त्याबाबत सपकाळ याने हडपसर पोलिसांकडे २०१७ मध्ये अर्ज केला होता़ त्याची चौकशी करुन ही दिवाणी बाब असल्याचे समजपत्र पोलिसांनी दिले होते़ गुन्हा दाखल न करता पोलिसांनी आपल्याला पैसे मिळवून द्यावेत, असे त्याचे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले की, याप्रकरणी पोलिसांनी ही बाब दिवाणी असल्याचे व तसे समजपत्र दिल्याची कागदपत्रे स्वप्नील सपकाळे यांचे वडिल व नातेवाईकांना दाखविली़ त्यांचे समाधान झाले असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या वडिलांची फिर्याद घेऊन मोरे याला अटक करण्यात आली आहे़ आत्महत्या करण्यापुर्वी स्वप्नील सपकाळ यांनी पोलिसांना एक व्हाटस मेसेज केला आहे.

पत्नी व मुलीलाही मारण्याचा होता विचार
या चिठ्ठीत त्याने पत्नी अंजली व मुलगी गौरीला मारण्याचा विचार केल्याचे दिसून येते़ त्यात त्याने लिहिले आहे की, अंजली आणि गौरीला पण माज्यासोबत घेऊन जाणार होतो, पण यासाठी तब्बल मी बरोबर दोन महिने विचार केला व नंतर मी स्वत:च जाण्यास सज्ज झालो, असे लिहिले आहे़ यामुळे गर्भवती पत्नी आणि मुलीला मारुन मग आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या मनात गेल्या दोन महिन्यांपासून घोळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Youth commits suicide by accusing police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.