शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

यंगस्टर्स नको यंगस्टार्स व्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:10 IST

सूर्य :- मी सूर्य, या सूर्यकुलाचा केंद्रबिंदू- निर्माता. तुझ्यावरील दिवस-रात्र, ऋतुचक्र, जलचक्र इत्यादी निसर्गचक्रांचा आधारस्तंभ. माझ्या मुखदर्शनाने पृथ्वीवासी ...

सूर्य :- मी सूर्य, या सूर्यकुलाचा केंद्रबिंदू- निर्माता. तुझ्यावरील दिवस-रात्र, ऋतुचक्र, जलचक्र इत्यादी निसर्गचक्रांचा आधारस्तंभ. माझ्या मुखदर्शनाने पृथ्वीवासी यांच्या दिवसाची सुरुवात होते. तुझी माणसं चंद्रावर उतरली, मंगळापर्यंतही पोहोचली, भविष्यात मंगळावरही उतरतील; परंतु माझ्याकडे वाकड्या नजरेने बघितलं तर क्षणातच भस्मसात करीन त्यांना.

गुरू:- काय सूर्यनारायणा, एवढा राग आलाय माणसांचा?पाहा रागाने किती लाल झालात. सांगायचेच राहिले, मी गुरु. कोणत्याही कार्यात गुरुच म्हणजेच माझं पाठबळ आवश्यक असतं असे म्हणतात.सगळ्यात मोठा आहे मी दिसायला बरं का!

शनि :- हा.. हा.. हा.. मी शनि, आजच्या विज्ञानयुगातही काही अंधश्रद्धाळू लोक मला घाबरतात. माझ्या साडेसातीला घाबरतात. ‘शनिची साडेसाती... नको रे बाबा' म्हणतात.

चंद्र :- मी चंद्र, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह. करवा चौथ, कोजागिरी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, रमजानचे उपवास एवढेच काय चतुर्थीचा उपवास पण माझं दर्शन झाल्याशिवाय सोडत नाहीत पृथ्वीवासी. तुझ्यामुळेच माझी निर्मिती झाली; परंतु माझेच महत्त्व वाढत आहे.

सूर्य:- बघ आम्हाला तुझी लेकरे किती मान देतात. तू ज्यांच्यासाठी जीवाचं रान करतेस, त्यांना तुझ्या पर्यावरण रक्षणाचे भानच नाही असे दिसते.

सर्वजण :- असे आम्ही सर्व या विश्‍वात मान असणारे नाहीतर तू!

कोण होतीस तू काय झालीस तू…

अगं वेडे पाहा वाया गेलीस तू….

पृथ्वी :- हो.. हो.. मी आहे वेडी. या माझ्या लेकरांसाठी, या पशु-पक्ष्यांसाठी, या चराचर सृष्टीसाठी.

सूर्य:- तुझ्या वेडाला काही अर्थच नाही.

गुरू :- हो बरोबर आहे सूर्याचं. तुझ्याच लेकरांनी सारी नैसर्गिक चक्रेच बिघडवली आहेत. त्यामुळे तुझ्या पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे.

शनि:- अगं किती कत्तल करत आहेत ही माणसं तुझ्या चराचर सृष्टीची, पशु-पक्ष्यांची, त्यांच्या निवाऱ्याची म्हणजे झाडांची. डोंगर पोखरत आहेत, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलत आहेत, रासायनिक खतांचा बेसुमार वापर करत आहेत.

चंद्र:- मला तर हे पृथ्वीच्या जवळ असल्याने (तुलनेने) हे सर्व पाहावतच नाही. काय दोष निष्पाप चराचराचा?

सर्वजण:- आम्ही सर्वजण पाहतोय ना, तुझी काय अवस्था केली आहे माणसांनी.

बुद्धी आहे म्हणून त्यांनी कसंही वागायचं,

आणि आपण नुसतंच बघायचं..

आपण जातो का आपल्या कक्षा सोडून!

सूर्य :- म्हणायला पृथ्वीमाता, धरतीमाता,

ऐकून घ्या माणसांच्या फक्त प्रगतीच्या बाता,

तूच सांग, कोण आहे तुझा त्राता?

पृथ्वी :- माणूस

सर्वजण :- काय s? s? s?

पृथ्वी :- हो..हो.. माणूसच.

त्याने बिघडवलय, तो सरळ करेल. मला विश्वास आहे माझ्या ममत्वावर. माझ्यासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या लेकरांसाठी तरी आपलं वागणं बदलेल. त्यांच्यासाठी नक्की बनेल पर्यावरणस्नेही!

चंद्र :- अगं डोळे उघडे करून बघ, तुझ्या सृष्टीत काय उलथापालथ केली माणसांनी. मग कळेल तुला त्यांचे खरे रूप.

गुरू :- अगं ऐक जरा, भूतलावरचे पर्यावरणीय घटक आपली काय व्यथा मांडत आहेत.

क्रमशः

ज्यांच्यामुळे पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखला जातो ते घटक एकमेकांशी संवाद साधताना…

पृथ्वी:- अवकाशात झेपावणारी माझी लेकरे मला विसरणार तर नाहीत ना ? सत्य बोलत आहेत का सर्वजण? विज्ञान-तंत्रज्ञानातील नवनव्या शोधांमुळे माणसाने अनेक अशक्यप्राय गोष्टी केलेल्या आहेत; परंतु प्रगतीच्या नावाखाली असंख्य निष्पाप पशु-पक्ष्यांना नामशेष करून कसला विकास साधत आहे तो?

वारा:- अगं सावर, स्वतःच्या मनाला आवर

अगं वाहतात सर्वत्र प्रगतीचे वारे,

देत आहेत लोक पर्यावरण रक्षणाचे ही नारे,

विसरून जा ,तुझे दुःख सारे …

सगळं ठीक होईल!

वृक्ष:- कसं सगळं ठीक होईल ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? माणसांनी बेसुमार वृक्षतोड केली आहे .त्यामुळे वातावरणातील वायूंचा समतोल राखणे, तापमान वाढ रोखणे ,जमिनीची धूप थांबवणे इत्यादी कार्यांसाठी आमचे वृक्षबळ कमी पडत आहे. आमच्यावर कामाचा किती ताण येतो.

ओझोन थर :- जागतिक तापमान वाढीचा तुलाच फटका बसला नाही, तर मलाही बसला आहे. मानवाच्या कृतींमधून निर्माण होणाऱ्या रासायनिक संयुगांमुळे, CFC, BFC सारख्या कार्बनमुळे माझ्या थराचा क्षय होत आहे. मी विरळ होत आहे. अंटार्क्टिका खंडाजवळ माझ्या थराला भगदाड पडले आहे. सूर्याच्या अतिनील किरणांपासून मी जीवसृष्टीचे रक्षण करतो, आता माझे रक्षण कोण करणार?

नदी :- जीवनदायी असणारी मी, माणसांनी मला विषवाहिनी बनवलंय. माणसं माझा नैसर्गिक प्रवाह बदलत आहेत, त्यात प्लास्टिक ,थर्माकोलचा अडथळा, मग काय करणार मी? गेल्यावर्षी माझ्या भगिनी सांगली, कोल्हापूरला अनेकांच्या घरात पाहुण्या म्हणून राहिल्या; पण दोष कोणाला? बिचाऱ्या पावसाला .‘माणसाची करणी आणि सर्वत्र तुंबलेले पाणीच पाणी.’

समुद्र :- रत्नाकर असणारा मी.. आता पाहा… माणसांनी मला घाणीचा साठा करून ठेवला आहे. अनेक महासागरामध्ये प्लास्टिक कचऱ्याची बेटे तयार झाली आहेत. जागतिक तापमान वाढीमुळे बर्फ वितळून माझी पातळी वाढत आहे; पण माझे बाष्परुपी ढग अडवायला डोंगर आणि झाडे आहेत तरी कोठे?

ढग :- ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ बरोबरच आता ‘ढग आडवा व पाऊस पाडा' म्हणण्याची वेळ आली आहे. खरं सांगतोय अडवायला कोणी नसल्याने दिशाहीन झाल्यासारखं बाष्पाचं ओझं घेऊन तरंगत तरंगत राहावं लागतं मला.

डोंगर :- माणसाने मला पोखरून, खोदून माझे, पर्वतराजींचे रूपच खूजे करून टाकले. त्यात माझ्यावरील वृक्षांचे आच्छादन कमी केल्याने, माझी शक्ती क्षीण झाल्यासारखी वाटत आहे. तुम्हीच सांगा कसं अडवणार बाष्पयुक्त वाऱ्यांना? आडवा हो या साऱ्यांना…. कशी लढवून मी पर्यावरण रक्षणाची खिंड? तुम्हीच सांगा.. तुम्हीच सांगा..

पाऊस :- मी पाऊस…नाही मला धो धो पडण्याची हौस! माणसांच्या वागण्याने वातावरण बदलले आणि मी ही. आम्लपर्जन्य, ढगफुटी, गारपीट ,अतिवृष्टी, वादळी पाऊस इत्यादी माजी तीव्र स्वरूपाची रूपे.

चिमणी :- मी चिऊताई..

एक घास चिऊचा …एक घास काऊचा.. आता कोणच म्हणत नाही.

सगळीकडे आलाय कबुतरांचाच (पारव्यांचा) महापूर.. ऐकू येत आहेत का माझे चिवचिव असे सूर?

प्लास्टिक व थर्माकोल :- आजच्या ‘युज अँड थ्रो'च्या जमान्याचे आम्ही राजे. माणसाने कोठेही फेकल्याने ओढे, नदी, नाले यात अडकून संपूर्ण जनजीवन विस्कळीत करणारे आम्ही. आजच्या युगातले खरे दानव. जागा होईल तो कसला मानव? हा..हा..हा..

कोरोना:- सर्व जागतिक व्यवहार ठप्प करणारा, तुम्हा माणसांना टाळ्यांत बंद करून ताळ्यावर आणणारा कोरोना . लोक म्हणतात ‘गो कोरोना गो'. बुद्धिमान माणसांच्या प्रयत्नांनी मी जाईनही; पण लोक सुधारले नाहीत, पर्यावरणस्नेही झाले नाहीत, तर मी पुन्हा येईल.. नव्या रूपात..

पृथ्वी :- दूर व्हा.. दूर व्हा.. तुम्ही. (प्लास्टिक , थर्माकोल व कोरोनाला उद्देशून)

लोकांच्या कल्याणासाठी देह झिजवणारे, पर्यावरणासाठी अहोरात्र झटणारे लोक, अनेक संस्था कार्यरत आहेत या भूतलावर, ज्या थेट विद्यार्थ्यांशी निगडित आहेत. ग्रेटा थनबर्गसारखी १७ वर्षीय तरुणी आंतरराष्ट्रीय परिषदा गाजवत आहे. राजकारण्यांसह, सर्व जनसामान्यांना ती हवामान बदलाबद्दल, भविष्य काळाबद्दल जागृत करत आहे. असे माझे यंगस्टर्स नव्हे यंगस्टार्स आहेत. उगवते तरुण तारे... आता पळून जा सारे… तुमचं सर्जिकल स्ट्राइक झालंच म्हणून समजा आता.

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढील अनर्थ टाळण्यासाठी पृथ्वीचा विश्वास सार्थ करायचा आहे.

चला तर मग एकजूट होऊया, पर्यावरणाला निकोप ठेवू या..

खऱ्या अर्थाने आपल्या देशाला, या जगाला, पर्यायाने आपल्या पृथ्वीमातेला प्रदूषणमुक्त करू या..

नकोत नुसते नारे.. एकजुटीने काम करू या सारे..

लेखन - बराटे प्रेमला अरुण

शिक्षिका- महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगर, पुणे-५२

भ्रमणध्वनी क्रमांक - ९९२१८१९६१५