शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतात बोलावून महिलेची हत्या केल्याप्रकरणी तरुणास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 12:06 IST

‘शेतात गाय शिरली आहे’, असा निरोप पाठवून महिलेला तिच्याच शेतात बोलावून खून करून दागिने लांबविणाºयाला जन्मठेप आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा

पुणे : ‘शेतात गाय शिरली आहे’, असा निरोप पाठवून महिलेला तिच्याच शेतात बोलावून खून करून दागिने लांबविणा-याला जन्मठेप आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. सी. भगुरे यांनी आदेश दिला आहे.ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली पंढरीनाथ झांबरे (वय २४, रा. टकलेनगर, मांजरी बुद्रुक) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. हरुबाई नारायण घुले (वय ६०, रा. टकलेनगर, मांजरी बुद्रुक) यांच्या खूनप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबाबत हरूबाई यांचा मुलगा दिगंबर नारायण घुले (वय २२) यांनी फिर्याद दिली. ही घटना मांजरी बुद्रुक, टकलेनगर येथील फिर्यादीच्या शेतात १० डिसेंबर २०१२ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली होती.झांबरे हा चोरीच्या उद्देशाने मृत हरूबाई यांच्यावर पाळत ठेवून होता. घटनेच्या दिवशी त्याने १५ वर्षीय मुलाद्वारे शेतात गाय शिरल्याचा निरोप हरूबाई यांना दिला. त्यानुसार त्या त्वरित शेतात गेल्या. त्या वेळी त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकण्यात आली. त्यांना नायलॉनच्या दोरीने बांधून १ लाख १९ हजार रुपयांच्या सोन्याचे दागिने काढऊन घेतले. त्यानंतर डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आला. हडपसर पोलिसांनी याबाबत तपास करून दोघांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यावर सुनावणी करत न्यायालयाने ज्ञानेश्वर याला खूनप्रकरणी जन्मठेप, १ हजार रुपये दंड आणि जबरी चोरीसाठी ७ वर्षे सक्तमजुरी, १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर, सबळ पुराव्याअभावी एकाची निर्दोषमुक्तता केली.या प्रकरणात सरकारी वकील विलास पटारे, सुनील हांडे आणि मच्छिंद्र गटे यांनी १४ साक्षीदार तपासले. त्यामध्ये मृत हरूबाई यांना निरोप देण्यासाठी गेलेल्या १५ वर्षांच्या मुलाची साक्ष आणि गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले दागिने हे पुरावे महत्त्वाचे ठरले. तपासी अधिकारी म्हणून हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार बी. एस. लोखंडे यांनी काम पाहिले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार ए. एस. गायकवाड, दादा राऊत यांनी मदत केली.

टॅग्स :Crimeगुन्हाCourtन्यायालय