कोंढवळ धबधब्यात तरुण पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:08+5:302021-06-18T04:09:08+5:30

तळेघर : श्री क्षेत्र भीमाशंकर अभयारण्यातील प्रसिद्ध अशा कोंढवळ येथील धबधब्यात पाय घसरल्याने पडून एक तरुण पडून बेपत्ता ...

The young man fell into the waterfall | कोंढवळ धबधब्यात तरुण पडला

कोंढवळ धबधब्यात तरुण पडला

Next

तळेघर : श्री क्षेत्र भीमाशंकर अभयारण्यातील प्रसिद्ध अशा कोंढवळ येथील धबधब्यात पाय घसरल्याने पडून एक तरुण पडून बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी घडली. या तरुणाचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यांनी गुरुवारी तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार पडल्याने बचावकार्य थांबवण्यात आले. एनडीआरएफकडून शुक्रवारी शोध मोहीम राबवण्यात येणार आहे.

लक्ष्मण सोन्याबापू लहारे (वय २९, मूळ गाव राहाता, जि. अहमदनगर) असे धबधब्यात पडून बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो शिक्रापूर येथील एका कंपनीत कामाला असून तो वर्षाविहारासाठी भीमाशंकर येथील कोंढवळ धबधबास्थळी आला होता. धबधब्याच्या ओढ्याला असलेल्या प्रचंड पाण्यामुळे लक्ष्मण वाहून गेला असून त्याचा तपास लागू शकला नाही. श्री क्षेत्र भीमाशंकर व परिसर हा अभयारण्यात आहे. सध्या या ठिकाणी पाऊस सुरू असून निसर्गसौंदर्य बहरले आहे. पावसामुळे येथील अनेक लहान-मोठे धबधबे सुरू झाले आहेत. अनेक पर्यटक येथे येत असतात. यामध्ये कोंढवळ धबधबा हा नेहमीच पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजता शिक्रापूर येथून निघालेले लक्ष्मण सोन्याबापू लहारे, अजय भरत कहाणे (वय २९, रा. शिक्रापूर), रवी अशोक कदरमंडलगी (वय ३५, रा. लोणी कंद), आनंद मारुती मोहिते (वय ४५), ओमकार आनंद मोहिते (वय १३), अंकिता आनंद मोहिते (वय १५, रा. शिक्रापूर) हे मोटारीने भीमाशंकर येथे आले. मात्र, मंदिर बंद असल्यामुळे ते दर्शनासाठी जाऊ शकले नाही. म्हणून हे सर्व वर्षाविहारासाठी भीमाशंकरजवळील कोंढवळ येथील धबधब्याकडे गेले. सकाळी ९.३० च्या सुमारास येथील मुख्य धबधब्याजवळील पाण्याजवळ लहारे पाय घसरून पाण्यात पडला.

फोटो : कोंढवळ येथील धबधब्यावरील कुंडात पडलेल्या तरुणाचा शोध घेताना ग्रामस्थ व पोलीस प्रशासन.

Web Title: The young man fell into the waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.