शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 03:54 IST

जेजुरी येथील होळकर तलावाच्या शेजारील एका शेतातील शेडमध्ये डोक्यात दगड घालून एका तरुणाचा खून झाला. ही घटना दि. ११ रोजी रात्रीच्या सुमारास घडली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

जेजुरी : जेजुरी येथील होळकर तलावाच्या शेजारील एका शेतातील शेडमध्ये डोक्यात दगड घालून एका तरुणाचा खून झाला. ही घटना दि. ११ रोजी रात्रीच्या सुमारास घडली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.यशोदीप ऊर्फ हनुमंत तुकाराम आंबोले (वय २९, रा. रीसे-पिसे, ता.पुरंदर, जि. पुणे) असे या तरुणाचे नाव आहे. या खूनाप्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की जेजुरी येथील होळकर तलावाशेजारील महेश सुभाष झगडे यांच्या शेतामध्ये पत्र्याच्या शेडचे काम चालू आहे. त्या शेडमध्ये एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून झाला असल्याची खबर शनिवार (दि.१२) रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास जेजुरी पोलिसांना मिळाली. जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगावे यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मयत तरुण यशोदीप आंबोले हा पुरंदर तालुक्यातील रीसे-पिसे (खोपडेवाडी) येथील रहिवासी आहे. गेल्या एक वर्षापासून तो त्यांचे मेव्हुणे तानाजी गणपत राजीवडे (रा. कोडीत बुद्रुक ता. पुरंदर, जि. पुणे) येथे राहत होता. रक्षाबंधनानंतर दि. ८ आॅगस्ट २०१७ रोजी यशोदीप याने मी चंदननगर येथे काम पाहण्यासाठी जातो, असे सांगून कोडीतवरून चंदननगर येथे गेला असे तानाजी राजीवडे यांनी फिर्यादीमध्ये नमूदकेले आहे.होळकर तलावाशेजारी असणाºया एका शेतातील शेडमध्ये पोलिसांना या तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे निदर्शनास आले. अज्ञात इसमांनी शुक्रवार दि. ११ रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात कारणासाठी हा खून केला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली. या तरुणाच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून त्याची माहिती पोलिसांना मिळाली.