शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याची आवक तिपटीने वाढली

By admin | Updated: December 26, 2016 03:21 IST

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक तीन पटीने वाढून भावातही किंचित वाढ

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक तीन पटीने वाढून भावातही किंचित वाढ झाली आहे. ही आवक ८२१ क्विंटलने वाढली आहे. तर बटाट्याच्या भावात घसरण झाली आहे. गवार, भेंडी व शेवगा तेजीत असून, टोमॅटो, कोबी, फ्लॉवरचे भाव गडगडले असून, २ व ३ रुपये किलोने विक्री होत आहे. माल पडून राहात असल्याने शेतकरी चिंतेत आहे. येथील बाजारात गेल्या तीन महिन्यांपासून जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगा यांची काहीच आवक झाली नाही. एकूण उलाढाल २ कोटी २० लाख रुपये झाली असून, ही उलाढाल ६५ लाखांनी वाढली असल्याची माहिती सभापती नवनाथ होले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली.कांद्याला या आठवड्यात ५०० ते १००० रुपये असा प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल भाव मिळाला. चाकणमध्ये कांद्याची आवक तिपटीने वाढूनही भावात किंचित वाढ झाली आहे. कांद्याचा कमाल भाव ९५० रुपयांवरून १००० रुपयांवर स्थिरावला. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल यांच्या विक्रीत घट झाली असून म्हैस व शेळ्या-मेंढ्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे.येथील मार्केट यार्डमध्ये कांद्याची एकूण आवक १२२१ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ८२१ क्विंटलने वाढूनही भावात ५० रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव ९५० रुपयांवरून १००० रुपयांवर स्थिरावला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १०७५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २५ क्विंटलने वाढून भावात १०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव ६०० रुपयांवरून ७०० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक ४ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही कमाल भाव ११०० रुपयांवर स्थिरावला.खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरुनगर येथील पालेभाज्यांच्या बाजारात ३ लाख जुड्या मेथीची आवक झाली, तर २ लाख ५० हजार जुड्या कोथिंबिरीची आवक झाली. शेलपिंपळगाव आवारात मेथीची २९ हजार जुड्या, तर कोथिंबिरीची ३८ हजार जुड्या, आणि शेपूची १ हजार जुड्यांची आवक झाली. चाकणला हिरव्या मिरचीची एकूण आवक ४१० पोती झाली असून, मिरचीला १००० ते १५०० रुपये असा भाव मिळाला.