शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआय आणि एसआरएफटीआय च्या संयुक्त प्रवेशासाठी यंदा विक्रमी अर्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 20:16 IST

एफटीआयआय व सत्यजित रे या दोन संस्था केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अखत्यारित  येतात.

ठळक मुद्देअभिनय अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक अर्ज 24 फेब्रुवारीला होणार लेखी परीक्षा गतवर्षी संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी 5292 अर्ज; त्यामध्ये यंदा 833 इतक्या अर्जांची वाढ

पुणे : फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) व कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ( एसआरएफटीआय) या संस्थाच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी यंदाच्या वर्षी देशभरातून 6125 इतके विक्रमी अर्ज आले आहेत. यामध्ये सर्वाधिक 1981 अर्ज अभिनय अभ्यासक्रमासाठी प्राप्त झाले असल्याची माहिती एफटीआयआय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एफटीआयआय व सत्यजित रे या दोन संस्था केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अखत्यारित  येतात. या दोन संस्थांमधील प्रवेशासाठी स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा द्यायला लागू नये; म्हणून संयुक्त प्रवेश परीक्षा घेण्याचा प्रस्ताव अनेक वर्षे दोन्ही संस्था प्रशासनाच्या विचाराधीन होता. परंतु तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प बारगळला होता. मात्र गेल्या वषीर्पासून ही संयुक्त परीक्षा घेण्यास प्रारंभ झाला आहे. गतवर्षी या संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी 5292 इतके अर्ज आले होते. त्यामध्ये यंदा 833 इतक्या अर्जांची वाढ झाली असून, 6125 इतके विक्रमी अर्ज परीक्षेसाठी प्राप्त झाले आहेत. यामध्ये अभिनयासाठी सर्वाधिक 1981 , त्यापाठोपाठ दिग्दर्शन आणि पटकथालेखन अभ्यासक्रमासाठी 1280 तर सिनेमँटोग्राफीसाठी 884 अर्ज प्राप्त झाले असल्याचे सांगण्यात आले आहेत. याशिवाय टेलिव्हिजन अँंड इलेक्ट्रॉनिक अँंड डिजिटल मीडिया ( इडीएम) अभ्यासक्रमासासाठी टीव्ही डायरेक्शन अँंड प्रॉड्युसिंग अँंड डायरेक्शन 388, इलेक्ट्रॉनिक सिनेमँटोग्राफी 352 आणि व्हिडिओ एडिटिंग अँड एडिटिंग करिता 199 अर्ज सादर झाले आहेत.   एफटीआयआय आणि एसआरएफटीआय या दोन संस्थांची संयुक्त लेखी प्रवेश परीक्षा दि. 24 फेब्रुवारी रोजी २०१९ या शैक्षणिक वर्षांच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणीच्या अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणार आहे. या दोन संस्थांपैकी किमान एका तरी संस्थेत प्रवेश मिळवून चित्रपट विषयाशी संबंधित विविध विषयांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना संयुक्त परीक्षा देता येईल. देशातील २६ केंद्रांवर जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट (जेईटी २०१९) घेतली जाणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न असे या परीक्षेचे स्वरूप असेल. लेखी परीक्षेतील निकालानुसार पुढील प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांची निवड होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.----------------------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआय