शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जकात विभागाची यंदा विक्रमी वसुली

By admin | Updated: April 8, 2017 02:07 IST

भरारी पथकाचा अभाव, अन्य सोई- सुविधांची वानवा, अशा प्रतिकूल परिस्थितीतही उच्चांकी उत्पन्न मिळविले आहे.

देहूरोड : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जकात विभागाने जकात निरीक्षक, वरिष्ठ लिपिक व कर्मचाऱ्यांची कमतरता, जकात चुकवून जाणाऱ्या वाहनांना पकडणाऱ्या भरारी पथकाचा अभाव, अन्य सोई- सुविधांची वानवा, अशा प्रतिकूल परिस्थितीतही उच्चांकी उत्पन्न मिळविले आहे.नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात जकात, पारगमन शुल्क व वाहन प्रवेश शुल्क कराची विक्रमी वसुली जकात विभागाने केली आहे. २० कोटी ४२ लाख २ हजार २०३ रुपयांचे उत्पन्न मिळवून आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या (२०१५-१६) तुलनेत जकात विभागाचे ९७ लाख ३६ हजार २०३ रुपयांनी उत्पन्न वाढले आहे. आर्थिक वर्षाअखेरीला दंडाची वसुली रक्कमही २६ लाखांवर गेली आहे. नोटाबंदीमुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये वसुली सर्वांत कमी झाली होती. कॅन्टोन्मेंटच्या जकात विभागात आर्थिक वर्षात पहिले पाच महिने मुख्य जकात अधीक्षकपद रिक्त होते. त्या वेळी जकात विभागाचा कार्यभार राहुल साळुंके यांनी सांभाळला होता. त्यानंतर सहा सप्टेंबरला भाग्यश्री शिंदे यांची जकात अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. विभागात जकात निरीक्षक, वरिष्ठ लिपिक यांच्यासह २४ कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही शिंदे यांच्यासह चंद्रकांत कुऱ्हाडे यांनी उपलब्ध कर्मचाऱ्यांना सहकार्य केल्याने त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. खासगीकरणविरोधी निर्णय योग्यच दोन वर्षांपूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक झाल्यांनतर पहिल्याच बैठकीत तत्कालीन सीईओ अभिषेक त्रिपाठी यांनी जकात विभागाचे जकात वगळून खासगीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्या वेळी तत्कालीन अर्थ समिती अध्यक्षा अरुणा पिंजण यांनी जकात विभागातील अपुरी कर्मचारी संख्या असताना वसुली केली़ पुरेसे मनुष्यबळ दिले असते तर आणखी वसुली करणे शक्य झाले असते, असे विविध मुद्दे विस्तृत माहितीसह मांडून ठेक्याची राखीव किंमत पंधरा कोटींहून अधिक सुचविली होती. ही किंमत तत्कालीन मुख्याधिकारी त्रिपाठी यांनी प्रस्तावित राखीव किमतीपेक्षा अधिक असल्याने खासगीकरण प्रस्ताव बारगळला होता. त्यांनतर जकात विभागाचे सतत उत्पन्न वाढत आहे. उपाध्यक्षा अ‍ॅड. पिंजण, अर्थ समिती अध्यक्ष विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू यांच्यासह सर्वच सदस्यांनी जकात विभागाच्या खासगीकरणास विरोध केला होता. (वार्ताहर)>उत्पन्न : तीन वर्षे चढता आलेख जकात विभागाने २०१४-१५ या आर्थिक वर्षात १६ कोटी ९ लाख ६ हजार ७०६ रुपयांची वसुली केली. २०१५-१६ मध्ये वसुली १९ कोटी ४४ लाख ६५ हजार ५२१ रुपयांवर पोहोचली होती. गेल्या आर्थिक वर्षात २० कोटी ४२ लाख २ हजार २०३ रुपयांची वसुली केली आहे. यात जकातपोटी ५ कोटी १ लाख ३ हजार ४८० रुपये, पारगमन शुल्कापोटी १३ कोटी ५२ लाख ३७ हजार ३०० रुपये, वाहन प्रवेश शुल्कापोटी १ कोटी ८१ हजार ३५० रुपये, दंडापोटी २६ लाख ७ हजार ३३४ रुपयांचा समावेश आहे. मात्र, नोटाबंदीमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जकात विभागाची वसुली १ कोटी ३६ लाख १३ हजार ५०८ रुपयांपर्यंत खाली आली होती.