शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

यंदा भाताचे प्रतिहेक्टर २८ क्विंटल उत्पादन

By admin | Updated: September 3, 2016 03:10 IST

भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील एकूण ७२,९५३ हेक्टर भातक्षेत्रापैकी ५७,६०२ हेक्टर क्षेत्रावर यंदा भातलागवडी पूर्ण झाल्या आहेत. लागवडींना काहीसा उशीर

पुणे : भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील एकूण ७२,९५३ हेक्टर भातक्षेत्रापैकी ५७,६०२ हेक्टर क्षेत्रावर यंदा भातलागवडी पूर्ण झाल्या आहेत. लागवडींना काहीसा उशीर झाला असला, तरी ७९ टक्के भातक्षेत्र यंदा लागवडीखाली आले आहे. खरिपातील प्रमुख पीक असून जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ व मुळशी या तालुक्यांत पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने यंदा सरासरी उतारा चांगला मिळणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. पश्चिम भागात राहणाऱ्या भातउत्पादक शेतकऱ्यांकडून दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर पावसाच्या पाण्यावर अबलंबून आसणारी भातशेती केली जाते. भातशेती हेच या भागातील शेतकऱ्यांच्या उदनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. या भागात आसणारे भातउत्पादनाचे क्षेत्र हे प्रामुख्याने जिरायती क्षेत्र म्हणून ओळखले जाते. यामुळे गेल्या काही वर्षांपासून केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आसणारी भातशेती निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडू लागली आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका भातशेतीला बसू लागला आहे. यंदाच्या हंगामात पावसाने काहीशी उशिराने सुरुवात केली. यामुळे भातलागवडीची कामे लांबली. लागवडीनंतर पावसाने जोरदार सुरुवात केल्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी या तालुक्यात लागवड केलेली भातपिके सडू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते; मात्र १५ आॅगस्टनंतर पावसाने सर्वत्र विश्रांती घेतल्याने हा वातावरणातील बदल भातशेतीला पूरक ठरू पाहत आहे. पावसाने लागवडीनंतर शेवटपर्यंत शेतकऱ्यांना साथ दिल्यास काहीशा उशिराने लागवडी झाल्या असल्या, तरी यंदाच्या हंगामात बागायती भागात भाताचे उत्पादन चांगले मिळेल अशी शक्यता आहे. (वार्ताहर)जुलैच्या महिन्यात भातलागवडी झालेले भात पोटरी व निसवण्याच्या अवस्थेत आहे. उशिराने लागवड झालेले फुटव्याच्या अवस्थेत आहे. बागायती भागात प्रतिहेक्टरी २८ क्विंटल, तर जिरायती भागात २२ क्विंटल याप्रमाणे उत्पादकता राहणार आहे.- सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या भागामध्ये आंबेमोहर, इंद्रायणी, जीर, रायभोग, बासमती या सारख्या अस्सल पारंपरिक जातीच्या भाताचे उत्पादन घेतले जाते. यंदा प्रत्येक तालुक्याची एकूण आकडेवारी वाढलेली असून, मावळ आणि खेड तालुक्यात उपलब्ध आसणाऱ्या एकूण क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर भातलागवडी झाल्याचे चित्र आहे. तालुकासरासरी क्षेत्रलागवड क्षेत्रटक्केजुन्नर१२८५८१२०२०९३.५आंबेगाव५७३०४९५०८६.४खेड६९६३.८७१२०१०२हवेली३४७३१८१८५२.३मुळशी१४२०९८३८५५९भोर८५४५६८४०८०मावळ१०१४९१०८७११०७.१वेल्हे९२९७.६४९१५५२.९पुरंदर१७२७.२६८३३९.५९