शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
4
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
5
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
6
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
7
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
8
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
9
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
10
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
11
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
12
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
13
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
14
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
15
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
16
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
17
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
18
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
19
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
20
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू

अख्खं एक वर्ष सरलं, उंबरठे झिजवले; मात्र अद्यापही शासनाचे १५ हजार 'वेटिंग मोड'वरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 20:22 IST

ज्येष्ठ नागरिकांना हिनतेची वागणूक : प्रशासकीय असंवेदनशीलता येतेय आडवी

ठळक मुद्देतहसीलदार कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सोयीस्कर दुर्लक्ष

पुणे :  शहरात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरानंतर शासनाने जाहीर केलेली अवघी १५ हजारांची मदत मिळविण्यासाठी शेकडो ज्येष्ठ नागरिकांना अद्यापही मामलेदार कचेरीमधील हवेली तहसीलदार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.येथील अधिकारी तीन-तीन तास या ज्येष्ठांना कार्यालयाबाहेर बसवून ठेवतात पण भेटत नाहीत. पुरग्रस्त नागरिकांच्या भळभळत्या जखमांवरील खपली काढण्याचा असंवेदनशील प्रकार घडत आहे. याकडे तहसीलदार कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.गेल्या वर्षी 25 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे उध्वस्त झालेल्या घरांचे सांगाडे अद्यापही तसेच उभे आहेत. अनेकांचे संसार अद्यापही उभे राहू शकलेले नाहीत. कोणी आपला भाऊ गमावला तर कोणी पत्नी, कोणी मुलगा गमावला तर कोणी आई वडील. पुराला एक वर्ष झाल्यानंतरही अनेकांना आपल्या हक्कासाठी झगडावे लागत आहे. सातारा रस्त्यावरील गुरुराज सोसायटीमधील 33 कुटुंबांना अद्यापही मदत मिळालेली नाही. पुराच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी नेमलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी पंचनाम्याच्या प्रती उशिरा दाखल केल्यामुळे या कुटुंबांना अद्यापही मदत मिळू शकलेली नाही. प्रशासकीय दिरंगाईचे खापर रहिवाशांवर फोडून यंत्रणा मोकळी झाली आहे.गेले वर्षभर सतत पाठपुरावा करुनही या नागरिकांच्या हाती काहीही पडलेले नाही. घरांसह घरामधील संसारोपयोगी वस्तूंचे लाखो रुपयांचे झालेले नुकसान शासनाच्या पंधरा हजारांनी भरुन निघणारे नाही. परंतू, बुडत्याला काडीचा आधार या उक्तीप्रमाणे काहीतरी हातभार नक्कीच मिळाला असता. या 33 जणांमध्ये बहुतांश वयोवृद्ध मध्यमवर्गीय नागरिक आहेत. त्यांच्याबाजूने आवाज उठविणारे कोणीही नाही. गेले वर्षभर हे नागरिक हवेली तहसीलदार कार्यालयात जाऊन चकरा मारत आहेत. परंतू, तेथील एकही अधिकारी त्यांना समाधानकारक उत्तर देत नाही. लेखनिकापासून वरिष्ठ अधिका-यापर्यंत सर्वजण उद्धट भाषेत आणि अरेरावीने या ज्येष्ठांशी बोलतात. कोणी धड माहितीही देत नाही.यासंदर्भात प्रांताधिका-यांचीही नागरिकांनी भेट घेतली. परंतू, त्यांच्याकडूनही पुन्हा तहसीलदार कार्यालयाकडेच बोट दाखविण्यात आले. काही जणांच्या नावाचे तर दोन दोन धनादेश निघाले. परंतू, गरजवंतांना अद्याप एकही धनादेश मिळाला नसल्याचे समोर आले आहे. निदान या वर्षात तरी मदत मिळेल अशी आशा हे नागरिक व्यक्त करीत आहेत.  

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीfloodपूरState Governmentराज्य सरकार