शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
4
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
5
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
8
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
9
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
10
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
13
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
14
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
15
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
16
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
17
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
18
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
19
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
20
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत

येत्या 6 ऑगस्टला सत्यमेव जयते वॉटर कपचा पुरस्कार सोहळा पुण्यात रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 20:31 IST

गेल्या वर्षी तीन तालुक्यांपासून सुरू झालेली  ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धा यंदा 30 तालुक्यांमध्ये घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्तकरण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले.

पुणे, दि. 27 - गेल्या वर्षी तीन तालुक्यांपासून सुरू झालेली  ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा यंदा 30 तालुक्यांमध्ये घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या वॉटर हिरोज चे कौतुक करण्याबरोबरच विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने दि. 6 आॅगस्ट रोजी  ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2017’ पुरस्कार सोहळा बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे रंगणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाऊंडेशनचे सह-संस्थापक आमीर खान आणि 4000 ग्रामस्थ उपस्थित राहाणार आहेत. स्पर्धेतील तीन गावांना प्रत्येकी अनुक्रमे 50 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार असल्याची माहितीपानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत  दिली. यावेळी किरण राव आणि डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते. यंदाच्या वर्षी 8 एप्रिल ते 22 मे या कालावधीत 30 तालुक्यांमध्ये सत्यमेव जयते वॉटर कप ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी एक शंभर मार्कांची गुणांकन पत्रिका तयार करण्यात आली आहे. जे ही पत्रिका सोडवतील तेच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. अगदी गावाचा ताळेबंद मांडण्यापासून वॉटर बजेट, हायड्रो मार्कर अशा गोष्टी गावक-यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून अवगत करून देण्यात आल्या आहेत.  ही चळवळ लोकवर्गणीतून उभी राहिली आहे, मग रक्कम स्वरूपात बक्षिसे कशासाठी? याविषयी विचारले असता स्पर्धेच्या 45 दिवसाच्या कालावधीत जलसंधारणाची सर्व कामे होणे शक्य नाही ही रक्कम त्या कामांसाठी वापरली जावी हा त्यामागचा उददेश आहे. ही बक्षिसे 4 कोटी 10लाख रूपयांची आहेत, 10 लाख रूपये हे सातत्याचे बक्षिस आहे. झाडे जगलीआहेत का? शोष खडडे कार्यरत आहेत का? यावर नियंत्रण ठेवले जात आहे, त्यासाठी हे बक्षिस देण्यात येणार असल्याचे भटकळ यांनी सांगितले.

अशी घेतली जाते स्पर्धाएखाद्या तालुक्याची निवड झाल्यानंतर त्यांना आमीर खानच्या सहीचे पत्र दिले जाते. ग्रामसभेत ठराव केल्यानंतर स्पर्धेसाठी गावाने अर्ज करायचा, मग ज्या लोकांना प्रशिक्षण द्यायचे आहे अशा पाच लोकांची नावे कळवायची यात दोन महिला असणे बंधनकारक आहे. यापूर्वी ज्या गावांमध्ये जलसंधारण झाले आहे अशाच गावांची प्रशिक्षण केंद्र म्हणून निवड करण्यात येते. जलसंधारणाची कामे कशी करायची याचे तांत्रिक ज्ञान त्यांना देण्यात येते. पाणी फाऊंडेशनने एक अँप तयार करण्यात आले आहे, त्यात स्पर्धेच्या नियमांची माहिती देण्यात आली आहे. तसेच पाणी फाऊंडेशन आणि वॉटर कपचा प्रवास मांडणा-या  ‘दुष्काळाशी दोन हात’ ही डॉक्युमेंट्ररी तयार करण्यात आली असल्याचे डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले.