शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

डब्ल्यूएसए, पुणे फाल्कन्स, कर्नाटका स्पोटर््स संघ विजयी

By admin | Updated: May 10, 2017 04:19 IST

विमेन स्पोर्टस असोसिएशन संघाने (डब्ल्यूएसए) तिसऱ्या आबेदा इनामदार अखिल भारतीय निमंत्रित महिलांच्या टी-२० क्रिकेट

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विमेन स्पोर्टस असोसिएशन संघाने (डब्ल्यूएसए) तिसऱ्या आबेदा इनामदार अखिल भारतीय निमंत्रित महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत एच. के. बाउन्स संघावर ९ विकेटनी मात केली. दुसरीकडे पुणे फाल्कन्स व कर्नाटका स्पोटर््स संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आझम स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने व्ही. एम. गानी स्पोटर््स कॉम्प्लेक्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या लढतीत बाउन्स संघाची कॅप्टन सई पुरंदरेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सई आणि सायली लोणकर यांनी संयमी सुरुवात केली. या जोडीने ८.१ षटकांत ३१ धावांची सलामी दिली. सई आणि सायली बाद झाल्यानंतर इतरांना फटकेबाजी करता आली नाही. चहिताली बी.ने २६ धावा जोडल्या. बाउन्स संघाला निर्धारित २० षटकांत ६ बाद ७९ धावाच फलकावर लावता आल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना डब्लूएसएची कॅप्टन मुक्ता मगरेने आक्रमक सुरुवात केली. तिने तीन सुरेख चौकार लगावले. मात्र, अनुभवी मुक्ताला मोठी खेळी करता आली नाही. यानंतर प्रियांका घोडके आणि चार्मी गवई यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची अभेद्य भागीदारी करून डब्लूएसए संघाला १२.५ षटकांतच विजय मिळवून दिला. संक्षिप्त धावफलक : एच. के. बाउन्स - २० षटकांत ६ बाद ७९ (सायली लोणकर २६, चहिताली बी. २६, सई पुरंदरे १६, मुक्ता मगरे ३.५-०-१३-२, निकिता आगे ४-०-१३-१, सायली अभ्यंकर २-०-१०-१) पराभूत वि. डब्ल्यूएसए- १२.५ षटकांत १ बाद ८३ (प्रियांका घोडके नाबाद ३९, चार्मी गवई नाबाद २६, मुक्ता मगरे १२, सोनिया डबिर ३.५-०-३७-१); पुणे फाल्कन्स - २० षटकांत ५ बाद १५९ (मानसी पटवर्धन नाबाद ३७, केतकी खांडेकर २८, पूनम जगताप २०, पूनम खेमनार २०, धनश्री पाकधने २-०-१७-२, गायत्री पाटील ४-०-२३-१, स्नेहल थोरात ४-०-२९-१) वि. वि. प्रवरा जेम्स-२० षटकांत ८ बाद ५३ (युगंधरा सप्रे १५, नीलम पाटील ४-१-६-३, वैष्णवी काळे ३-१-१०-२, मानसी पटवर्धन ४-१-५-१); आझम स्पोर्टस अ‍ॅकॅडमी - १९.१ षटकांत सर्वबाद ४३ (संजना शिंदे १८, सिमरन हेन्री ३.१-०-६-३, प्रतुषा ४-०-१२-३, श्रेयांका ४-१-६-२, वंदना महाजन ४-२-५-१) पराभूत वि. कर्नाटका स्पोर्टस - ५.१ षटकांत ४ बाद ४४ (आदिती नाबाद १४, सिमरन हेन्री नाबाद ८, ऋचिता परदेशी १.५-०-२०-१, फरहाना शेख २.१-०-१६-१, उत्कर्षा देशपांडे १-०-८-१).