शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
4
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
5
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
6
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
7
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
8
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
9
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
10
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
11
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
12
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
13
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
14
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
15
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
16
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
17
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
18
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
19
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
20
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

‘फ्री सोल ग्रुप’ला ‘वर्ल्डस्टे फेस्ट रायडर्स’ किताब

By admin | Updated: January 6, 2015 00:14 IST

यशासाठी आवश्यक असलेला संयम व कार्यक्षमतेची जाणीव करून देणाऱ्या अमेरिकेतील 'आयर्न बट' असोसिएशनचे आव्हान पुण्यनगरीतील चार युवक व एका महिला दुचाकीस्वारांनी पेलले.

सहकारनगर : तरुणाईला वेळेचे भान शिकविणारी जिद्द व चिकाटी, शाश्वत यशासाठी आवश्यक असलेला संयम व कार्यक्षमतेची जाणीव करून देणाऱ्या अमेरिकेतील 'आयर्न बट' असोसिएशनचे आव्हान पुण्यनगरीतील चार युवक व एका महिला दुचाकीस्वारांनी पेलले. अवघ्या तेवीस तासांत १,६४२ किलोमीटर अंतर कापून त्यांनी 'वर्ल्डस्टे फेस्ट रायडर्स' होण्याचा किताब पटकावला आहे. अमेरिकेतील 'आयर्न बट' असोसिएशनचे आव्हान जगभरातील हौशी दुचाकीस्वार स्वीकारतात आणि प्रशस्तिपत्र मिळवतात. वर्षाकाठी जगभरातील हजारो युवक हा प्रयत्न करतात. वेगावर नियंत्रण, मद्यपानविरहित केवळ एकच यु टर्न घेण्याचा नियम असलेल्या या मोहिमेत चोवीस तासांत सोळाशे दहा किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. ते आव्हान पुण्यातील या पाच युवकांनी स्वीकारले. कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर तीन जानेवारीला पहाटे तीन वाजता ही मोहीम सुरू झाली. आंबेगावचा रोहन पानगंटी, तळजाई पठारचा नरेश कांबळे, हडपसरचे जयप्रकाश व अनुली मुळे हे दाम्पत्य आणि नरेश तांबडे यांनी 'सॅडल सोर' या मोहिमेला सुरुवात केली. चोवीस तासांत 'मिशन सोळाशे किलोमीटर' या मोहिमेसाठी बेंगलोरकडे जायला निघाले. (वार्ताहर)असा केला प्रवास...चार बुलेटवरून पाचजण कडाक्याच्या थंडीत निघाले. सुरूवातीचा प्रवास वेगवान झाला. तीन तासांत त्यांनी कोल्हापूर गाठले. मध्येच त्यांना पावसाचा तडाखा बसला. मात्र, न डगमगता थेट बेळगावनंतर तब्बल बारा तासांनी बेंगलोर गाठले. यु टर्न घेतला आणि परतीचा प्रवास सुरू झाला. चार जानेवारीला मध्यरात्री दीडच्या सुमारास आंबेगाव येथे सर्वजण पोहोचून हा बहुमान मिळविला.