शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गडकिल्ल्यांवर लोकवर्गणीतून कामे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 04:02 IST

किरकोळ दुरुस्ती करता येणार; ‘पुरातत्त्व’ विभागाशी करार करावा लागणार

- नम्रता फडणीसपुणे : महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या किरकोळ दुरुस्ती व संवर्धनाच्या कामे करण्याच्या पद्धतीमध्ये राज्य शासनाने आता सुसूत्रता आणली आहे. ज्या सामाजिक संस्था किंवा व्यक्ती गडकिल्ल्यांवर किरकोळ दुरुस्तीची कामे अथवा प्रसाधनगृह उभारण्यास इच्छुक आहेत, त्यांना राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाशी करारनामा करावा लागेल. गडकिल्ल्यांवर संस्था, व्यक्ती, लोकसहभाग किंवा लोकवर्गणीतून कामे करण्यासाठी नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत.गडकिल्ले हे महाराष्ट्राचे दुर्गवैभव आहे. राज्यातील काही गडकिल्ल्ले हे संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आल्याने त्यांची दुरुस्ती व संवर्धनाची कामे गड संवर्धन समितीच्या शिफारशीनुसार शासनाच्या उपलब्ध निधीतून करण्याची जबाबदारी राज्याच्या पुरातत्त्व खात्याची आहे. काही स्वयंसेवी संस्था व व्यक्तींकडून गडकिल्ल्यांवर खारीचा वाटा म्हणून पुरातत्त्व खात्याच्या परवानगीनुसार काही किरकोळ कामे केली जातात. मात्र, याच कामाच्या पद्धतीमध्ये आता शासनाने सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील गडकिल्ल्यांवर किरकोळ जतन दुरुस्ती व संवर्धनाच्या कामे तसेच प्रसाधनगृहांची उभारणी स्वयंसेवी संस्था, व्यक्ती तसेच लोकवर्गणी व लोकसहभागातून उभारलेल्या निधीद्वारे शासन नियुक्त कंत्राटदाराकडून परस्पर करून घेण्याची परवानगी शासनाकडून पुरातत्त्व खात्याला देण्यात आली आहे. मात्र, यासाठी इच्छुक सामाजिक संस्था आणि व्यक्ती यांना राज्याच्या पुरातत्त्व संचालनालयाशी करारनामा करावा लागणार आहे. या शासन निर्णयामुळे गडकिल्ल्यांवर कामे करणाऱ्या विविध संघटनांना दिलासा मिळाला आहे.गडकिल्ल्यांच्या कामासाठी निधी पुरातत्त्व खात्याने देण्याऐवजी संबंधित खासगी संस्था देतील, असा निर्णय शासनाने दिला आहे. सामाजिक स्वयंसेवी संस्था किंवा व्यक्ती यांना राज्याच्या पुरातत्त्व खात्याबरोबर जो करारनामा करावा लागणार आहे, त्यामध्ये ज्या संस्था प्रसाधनगृहे बांधू इच्छितात त्यांनी त्या प्रसाधनगृहांची दैनंदिन दुरुस्ती व देखभाल कशा प्रकारे केली जाईल याबाबत त्यांचे धोरण काय असेल, या संदर्भात पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या संचालकांकडून संबंधितांकडे प्रथम विचारणा केली जाईल.तसेच, लोकसहभागातून प्रसाधनगृहाची उभारणी करण्याची मागणी करणाºया संस्थांना प्रसाधनगृहाची उभारणी करण्याबरोबरच त्याची ३६५ दिवस दैनंदिन देखभाल करण्याच्या अटीवरच मान्यता देण्यात येईल, अशा अटींचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती पुरातत्त्व खात्याकडून देण्यात आली आहे.नियमावलीमुळे विकासकामे लागणार मार्गीपूर्वीपासूनच गडकिल्ल्यांची कामे ही लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून करण्याची तरतूद आहे. फक्त ती कामे कशी करायची? कुणाला द्यायची? निधी कसा घ्यायचा? या संदर्भात शासनाचे नियम नव्हते.एखादा गडकिल्ला शासनाकडे नाही, तो भविष्यात संरक्षित होईल तोपर्यंत स्वयंसेवी संस्था किंवा व्यक्तीला त्या गडकिल्ल्यावर प्रसाधनगृह किंवा किरकोळ कामे करायची आहेत; मग त्यांना अधिकार द्यायचा का? कुणाला काम द्यायचे? अशी कोणतीच शासनाची स्पष्ट नियमावली नव्हती.ही नियमावली आल्यामुळे कुठलीही एखादी कंपनी, संस्था किंवा व्यक्ती गडकिल्ल्यांवर किरकोळ कामे करण्यास इच्छुक असेल तर ते काम पुरातत्त्वीय संकेतानुसारच वास्तुविशारदाच्या मार्गदर्शनाखाली कंत्राटदारांकडून करून घेतले जाणार आहे.सरकारदफ्तरी अशी तरतूद पूर्वीपासून आहे. म्हणजे एखादा किल्ला दत्तक घ्यायचा असेल, तर त्यावर काय कामे करायची आहेत, याची माहिती पुरातत्त्व खात्याला देऊन परवानगी घ्यावी लागायची. त्यांच्या नियमानुसारच ते काम करावे लागे. आम्ही काय कामे करणार, हे सांगितल्यानंतर पुरातत्त्व खात्याची एक टीम तिथे जाऊन पाहाणी केल्यानंतरच कामाला हिरवा कंदील दिला जायचा. आताही फारसा बदल झालेला नाही. तरतूद आहेच; फक्त काही नियमांत बदल करून ते नव्याने आणले आहेत. गेल्या पाच वर्षांत गडकिल्ल्यांबाबत जनजागृती झाली आहे. राज्यातील गडकिल्ल्यांची विभागणी ही राज्य पुरातत्त्व खाते, केंद्र शासन आणि मालकी हक्क या तीन भागांत आहे. राज्य आणि केंद्राचे नियम वेगळे आहेत. या नवीन नियमावलीमुळे पुरातत्त्व खात्याने संस्थांबरोबर संलग्नपणे काम करण्याची तयारी दर्शविली आहे, हीच सकारात्मक बाब आहे.- नितीन पाटोळेदुर्गसंवर्धन प्रतिष्ठान

टॅग्स :Fortगड