शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात सुरक्षासाधनांशिवाय राबताहेत कामगार

By admin | Updated: July 7, 2017 03:39 IST

सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, सेफ्टी शूज अशा कोणत्याही सुरक्षासाधनांशिवाय कामगारनगरीमध्ये कामगार राबत असल्याचे धक्कादायक

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, सेफ्टी शूज अशा कोणत्याही सुरक्षासाधनांशिवाय कामगारनगरीमध्ये कामगार राबत असल्याचे धक्कादायक चित्र सर्रास पहायला मिळत आहे. रोजीरोटीसाठी लाख मोलाचा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य आहे, हे यावरुन अधोरेखीत होते. महावितरण, रंगकाम असो किंवा जाहिरात फ्लेक्स या सर्वच क्षेत्रात असंघटीत कामगार काम करत आहेत. या कामगारांना सुरक्षासाधने पुरविण्याची जबाबदारी संबंधित कंपनी अथवा ठेकेदाराची असते. मात्र, पैशांची बचत अथवा अफरातफर करण्यासाठी सुरक्षासाधनांची खरेदीच केली जात नाही. त्यामुळे नाईलाजास्तव या कामगारांना सुरक्षासाधनांशिवाय धोकादायक पद्धतीने काम करावे लागते.औद्योगिक क्षेत्रात छोट्या वर्कशॉपमध्ये कामगारांच्या सुरक्षासाधनांबरोबरच आगप्रतिबंधक यंत्रणा, आपत्कालिन यंत्रणा, सायरन आदींचा अभाव पहायला मिळतो. सुरक्षासाधने नसल्याने यापूर्वी औद्योगिकनगरीत अनेक दुर्घटना झाल्याची उदाहरणे सांगता येतील. मात्र, या दुर्घटनांवरुन संबंधित कंपन्या अथवा ठेकेदार कोणताच धडा घेत नाहीत.अकुशल कामगार आपल्या संरक्षणाच्याबाबतीत जागरुक नसल्याचे चित्रही समोर येते. बांधकाम व्यवसायाच्या साईटवर कोणत्याही प्रकारचे सुरक्षासाधन न वापरता २०व्या मजल्यापर्यंत काम करावे लागते. यातून उद्भवणाऱ्या धोक्याचे कामगार आणि ठेकेदार दोघांनाही सोयरसुतक नाही की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. कामगार कल्याण मंडळाने अशा असंघटित कामगारांच्या सुरक्षेविषयी ठोस पावले उचलून सुरक्षासाधनांची सक्ती आणि अंमलबजावणी करणे, आवश्यक आहे.