शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन योजनेच्या लाभासाठी कामगारांची धावाधाव

By admin | Updated: June 10, 2017 02:09 IST

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गतच्या पेन्शन योजनेचे सदस्य असलेल्या कामगारांना पेन्शन रकमेत वाढ देण्यासंबंधिचा

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गतच्या पेन्शन योजनेचे सदस्य असलेल्या कामगारांना पेन्शन रकमेत वाढ देण्यासंबंधिचा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील कामगार कुटुंबीय सुखावले असले तरी त्यांना वाढीव पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. ज्या कंपनीतून कामगार निवृत्त झाले़ त्यातील बहुतांशी कंपन्या सद्या बंद आहेत. योजनेच्या लाभासाठी कराव्या लागणाऱ्या अर्जावर संबंधित कंपनी व्यवस्थापनाचा सही, शिक्का घ्यावा लागत असल्याने अनेकांवर बंद कंपन्यांच्या कार्यालयांचे उंबरे झिजविण्याची वेळ आली आहे. औद्योगिक नगरीत अनेक कंपन्या कामगारांची सेवानिवृत्ती होण्याआगोदरच बंद पडल्या आहेत. कामगारांना त्यांच्या देय रकमा अद्याप पूर्णपणे मिळू शकल्या नाहीत. पेन्शन तर दूरची बाब आहे. पिंपरीतील गरवारे कंपनीतील कामगारांचा गेल्या २० वर्षांपासून देर रकमेच्या मागणीसाठी लढा सुरू आहे. फतेजा फोर्जिंग, पूना बॉटलिंग, कार्ड क्लोदिंग, फिलीप्स तसेच अन्य या कंपन्या बंद झाल्या. काही कंपन्या स्थलांतरित झाल्या. या कंपन्यांमध्ये काम केलेल्या कामगारांना अद्यापही पेन्शन स्वरूपात काहीतरी लाभ पदरात पडेल, अशी आशा आहे. यातील काही कंपन्यांत काम करणाऱ्या कामगारांच्या हातात पेन्शन स्वरूपात काही रक्कम पडत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून कामगार कुटुंबीय आता बँक अधिकारी तसेच कंपन्यांच्या कार्यालयात धाव घेऊ लागले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये एक लाखाहून अधिक कामगार पेन्शन लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.