शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची जाणीवपूर्वक बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 04:53 IST

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हा तळागाळातल्या लोकांचा पक्ष असून तो कार्यकर्त्यांच्या फळीमुळे उभा आहे. मी केवळ भाषण करून इथपर्यंत आलो नाही, तर कार्यकर्त्यांच्या जोरावर आलो आहे.

पुणे - भारतीय जनता पार्टीमुळे राज्य घटना, दलितांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. मात्र, भाजपाला जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. आंबेडकरांच्या संविधानाला धक्का लागलाच तर वाटेल ते बलिदान देण्याची माझी तयारी असून मंत्रिपदही सोडेन, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे सांगितले.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे (आठवले गट) राज्यस्तरीय अधिवेशन झाले.आरपीआय पक्ष हा केवळ दलित वस्तीचा नाही तर गावाचा पक्ष झाला पाहिजे, असे आठवले म्हणाले. शिवसेनेने भाजपाबरोबर युती करावी, अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.बापट म्हणाले, आरक्षणाला धक्का लावण्याचा भाजपाचा कुठलाही विचार नाही. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातही बदल केला जाणार नाही.

  रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हा तळागाळातल्या लोकांचा पक्ष असून तो कार्यकर्त्यांच्या फळीमुळे उभा आहे. मी केवळ भाषण करून इथपर्यंत आलो नाही, तर कार्यकर्त्यांच्या जोरावर आलो आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पक्ष विस्तारला असून पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारातला भारत उभा करायचा आहे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी व्यक्त केले.आरपीआयच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या अधिवेशनात आठवले बोलत होते. ते म्हणाले, दलितांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी शासनाची चर्चा सुरू आहेत. तसेच शासनाने २०१४ पर्यंतच्या झोपडपट्ट्यांना मान्यता द्यावी, गरिबांना ४५० स्क्वेअर फुटाचे घर द्यावे, दलितांचे कर्ज माफ करावे, गायरान पडीक जमिनींचा मुद्दा मार्गी लावावा, या अनेक मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. काँग्रेसवर टीका करताना आठवले म्हणाले, की राहुल गांधी यांनी संविधानाची चिंता करू नये. संविधान बचाव मोर्चा काढण्याऐवजी त्यांनी काँग्रेस बचाव असा मोर्चा काढावा. कारण येत्या काळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील काँग्रेस हद्दपार होणार आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारणnewsबातम्या