शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

त्या कामगाराचे ३७ दिवस उपोषण; तरीही न्याय मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 02:56 IST

कंपनी व्यवस्थापनातील अधिकाºयांनी खोटे आरोप करून बदनामीसह गेल्या ११ महिन्यांपूर्वी कामावरून तडकाफडकी निलंबित केल्याप्रकरणी महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील इंडूरन्स टेक्नोलॉजी लिमिटेड कंपनीच्या विरुद्ध कंपनीचे कामगार संजय चिंधू सावळे यांनी न्याय मिळण्यासाठी तब्बल एक महिन्यापासून सुरू केलेले

महाळुंगे -  कंपनी व्यवस्थापनातील अधिकाºयांनी खोटे आरोप करून बदनामीसह गेल्या ११ महिन्यांपूर्वी कामावरून तडकाफडकी निलंबित केल्याप्रकरणी महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील इंडूरन्स टेक्नोलॉजी लिमिटेड कंपनीच्या विरुद्ध कंपनीचे कामगार संजय चिंधू सावळे यांनी न्याय मिळण्यासाठी तब्बल एक महिन्यापासून सुरू केलेले आमरण उपोषण आज बुधवार ( दि.७ मार्च) ३७ व्या दिवशीही सुरूच आहे. न्याय मिळत नसल्याने सावळे हे आपल्या आमरण उपोषणावर ठाम राहिले असून, एक ना एक दिवस आपल्याला न्याय मिळेल, या प्रतीक्षेत आहेत.उपोषणस्थळी कंपनीचा कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी अद्याप फिरकला नसून, सावळे हे दिवसभर उपोषणस्थळी नेमके काय करतात, त्यांना भेट देण्यासाठी कोण कोण येतात, यासाठी कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी उपोषणस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.सावळे यांनी हरियाना राज्यातील माने सर या गावात इंडूरन्स कंपनीत सलग दोन वर्षे काम केले आहे. त्यानंतर सावळे यांना चाकण येथील याच कंपनीत कामाला जाण्याचा आदेश देण्यात आला होता. कंपनी व्यवस्थापनाचा आदेश ते चाकण येथे स्थायिक झाले.या कंपनीत नोकरीवर असताना कंपनी व्यवस्थापनाने सावळे यांना त्रास देण्यास सुरुवात केली. हरियाना येथील कारखान्याबाबत सावळे यांच्यावर अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.कंपनीचे आरोप फेटाळून लावत ते सिद्ध करून दाखवावेत, असे आवाहन सावळे यांनी केले आहे.खातेनिहाय चौकशीचे कारण पुढे करत कंपनी व्यवस्थानाने सावळे यांना कामावरून निलंबित केले. कंपनीने ६ मे, २०१७ पासून सेवा कथीत बेकायदेशीरपणे कमी केल्याने सावळे यांच्यावर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. त्यांनीसोमवारपासून (दि. २९ जानेवारी) सुरू केलेले आमरण उपोषण आज बुधवारीही (दि.७ मार्च) म्हणजेच ३७ व्या दिवशीही सुरूच आहे.कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकरयांचे स्वीय सहायकाने संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून सावळे यांच्या प्रकृतीची विचारणा केली. सावळे यांनी उपोषण सोडून कामगार आयुक्तांशी चर्चा करावी. यातून मार्ग निघण्यास विलंब होत असेल तर कामगार मंत्र्यासमोर या उपोषणाची दखल घेतली जाईल. चाकण भागात पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आले असता या कंपनीच्या काही पदाधिकाºयांनी सावळे यांचे उपोषण बेकादेशीर असून, त्यांना हटविण्यात यावे. असे सांगितले. मात्र, सावळे यांनी सांगितले की, कंपनीच्या लोकांनी नांगरे पाटील यांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केली आहे.उपोषण स्थळावर सीसीटीव्हीआमरण उपोषणावर ठाम असलेल्या सावळे यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात असून, उपोषण कालावधीत उपोषण स्थळावरील त्यांचा काही समाजकंटकांनी मंडपही गायब केला. तर काहींनी फ्लेक्सची फाडतोड केली.रात्रंदिवस सावळे उपोषणस्थळी नेमके काय करतात, याकरिता या कंपनीने सीसीटीव्ही कॅमेरे उपोषण स्थळावर लावले आहेत. तरीही सावळे एक महिन्यासह आठ दिवस उलटून देखील उपोषण स्थळावरून हटले नाहीत.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या