शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचे आंदोलन चिघळले

By admin | Updated: May 9, 2016 00:49 IST

कंपनीकडून कामगारांवर झालेल्या अन्यायाबाबत आवाज उठविण्यासाठी आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार दिनीच ४०० कामगार उपोषणास बसले आहेत

कोरेगाव भीमा : सणसवाडी आणि पिंपळे जगताप येथील दोन युनिटमध्ये असलेल्या इनोव्हेटिव्ह इंडस्ट्रीज लि. कंपनीकडून कामगारांवर झालेल्या अन्यायाबाबत आवाज उठविण्यासाठी आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार दिनीच ४०० कामगार उपोषणास बसले आहेत. पर्याय न निघाल्याने व २३ कामगारांना रुग्णालयात दाखल केल्याने आज कामगारांच्या पत्नींनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.सणसवाडी येथे सात दिवसांपासून ४०० कामगार राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास बसलेले आहेत. कंपनी व्यवस्थापक चंदू चव्हाण याकडे दुर्लक्ष करत असून, २३ कामगारांना रुग्णालयात दाखल केले आहे. कंपनी व्यवस्थापक याकडे फिरकले नसल्याने आज अचानक अनेक कामगारांच्या महिलांनी लहान मुलांसह शिक्रापूर पोलीस ठाणे गाठले.कंपनी व्यवस्थापकास आमच्या समोर हजर करा, अशी मागणी करत पोलीस ठाण्यातच तब्बल चार तास ठिय्या मांडला. या वेळी महिलांनी कंपनी प्रशासना विरोधात घोषणा देत ठिय्या मांडला. पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी कंपनी व्यवस्थापकाशी फोनवर चर्चा करून कामगारांच्या प्रश्नांबाबत उद्या बैठक घेण्याचे सांगितले. महिलांनादेखील याबाबत उद्या सकाळी दहाच्या सुमारास तातडीची बैठक घेऊन कामगारांबाबत निर्णय घेण्याच्या सूचना व्यवस्थापकास केल्या असल्याचे सांगितले. परंतु, कंपनी व्यवस्थापकामुळे आमच्या पतींना उपोषणास बसण्याची वेळ आली असल्याने त्यांची प्रकृती आता चिंताजनक झालेली असून, त्यांना कंपनी व्यवस्थापक आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे, त्यामुळे चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करा व अटक करा, अशी मागणी त्यांनी केली. संतप्त महिला काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. फक्त चव्हाण यांना समोर आणा किंवा अटक करा, या भूमिकेवर ठाम राहिल्या. यानंतर यशवंत भोसले पोलीस स्टेशन येथे आले आणि त्यांनीदेखील महिलांना उद्या बैठक आयोजित केलेली असून यातून काही निर्णय नक्कीच निघणार असल्याचे सांगितले व आता महिलांनी येथून उठावे, अशी विनंती केली. तरीही महिला ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या.