शिववस्ती ते ठाकरवाडी रस्त्याचे यापूर्वी ग्रामपंचायत निधीतून मुरुमीकरण झाले आहे. मात्र पावसाळ्यात पुराच्या पाण्याने संपूर्ण रस्ता वाहून जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश आल्हाट यांच्यासह इतर ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्याकडे पाठपुरावा करून रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला आहे. मात्र निधी मंजूर होऊनही संबंधित रस्त्याचे काम रखडले आहे.
याबाबत ग्रामपंचायत सदस्या रुपाली भानुदास आल्हाट यांनी संबंधित जिल्हा परिषद अध्यक्ष, प्रांताधिकारी, तहसीलदार, ग्रामपंचायत आदींकडे स्थानिक व इतर ग्रामस्थांनी एकत्र येऊन वेळोवेळी निवेदने दिली आहेत. रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
--
"संबंधित रस्त्याची महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. दोन्ही बाजूने मधोमध रस्ता व्हावा, अशी बाधित शेतकऱ्यांची मागणी आहे. यावर तोडगा काढून लवकरच संबंधित रस्त्याचे काम सुरू केले जाईल.
- गणेश कोळेकर, सरपंच
--
" वडिलोपार्जित शेती करण्यासाठी आम्हाला आठवत आहे तेव्हापासून याचमार्गे शेतात जाण्यासाठी रस्ता होता. रस्त्याचे काम होत नसल्याने शेतातील मशागतीसाठी ट्रॅक्टर व इतर वाहने शेतात घेऊन जाता येत नाहीत.
-
- गणेश सर्जेराव आल्हाट, स्थानिक शेतकरी.
फोटो ओळ : कोयाळी हद्दीतील रखडलेला शिववस्ती ते ठाकरवाडी रस्ता.