नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर सहापदरीकरणाची कामे वेगाने सुरू असून, ही कामे अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची होत आहेत. या महामार्गाच्या कामाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स इन्फ्रा कंपनीकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याने रस्त्याचे काम अनेक ठिकाणी खराब झाले असल्याने प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. नसरापूरपासून जवळच असलेल्या वरवे ते शिवरे, खोपी या गावांच्या शेजारील महामार्ग अनेक ठिकाणी खचला आहे. रस्त्याचे काम उरकण्याच्या गडबडीत रस्ता भक्कम झाला की नाही, हे न तपासता उलट रस्त्याचे काम उरकण्याचा संबंधित ठेकेदाराकडून प्रयत्न केला गेला आहे. रस्त्याचे कामही अनेक ठिकाणी संथपणे सुरू आहे. खराब कामामुळे या रस्त्यावर अपघात झाले आहेत. (वार्ताहर)
पुणे-सातारा महामार्गाचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2015 03:59 IST