शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी महिलेचे जिल्हाधिकारी कार्यालयात महिनाभर काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 01:50 IST

एकाच्या ओळखीतून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी नोकरी लावतो, यावर विश्वास ठेवला़

पुणे : एकाच्या ओळखीतून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी नोकरी लावतो, यावर विश्वास ठेवला़ महिला व तिच्या दिराच्या नोकरीसाठी त्यांनी २ लाख ७० हजार रुपये दिले़ त्यानंतर या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये महिनाभर आवक, जावक इतर किरकोळ स्वरूपाची कामे केली़ त्यानंतर पगाराविषयी विचारणा केल्यावर उपजिल्हाधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले़ आपण तुम्हाला ओळखतच नाही़ पैसे देऊन नोकरी लागते, असा प्रकार होत नसल्याचे सांगितले़या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी श्रीकांत पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ पवार हा देव मामलेदार संस्थेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डेटा एंट्री आॅपरेटर असल्याचे या महिलेला समजले़ याप्रकरणी वडगाव बुद्रुक येथील एका ३३ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे़याबाबत पोलिसांनी सांगितले की, या महिलेचे पती उदरनिर्वाहासाठी मिळेल त्या ठिकाणी पूजापाठ करण्याचा व्यवसाय करतात़ कात्रज येथील खंडोबा मंदिरात त्यांच्या दिराची ५ ते ६ महिन्यांपूर्वी श्रीकांत पवार याची भेट झाली़ त्याने जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी लावतो, असे सांगून त्यासाठी दीड लाख रुपये लागतील, असे सांगितले़ या महिलेलाही त्याने नोकरीचे आश्वासन दिले़ त्यानुसार त्यांनी नातेवाईकांकडून व पतसंस्थेतून कर्ज काढून पवार याला २ लाख ७० हजार रुपये दिले़ १३ नोव्हेंबर २०१८ रोजी पवार याने या महिलेला जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये पवार भेटले़ त्याच्या सांगण्यावरून त्या साधारण महिनाभर आवक-जावक, इतर किरकोळ स्वरूपाची अर्ज टाईप करणे, शिक्के मारणे यासारखी कामे केली़ ही कामे करताना त्यांची कार्यालयातील महिला व इतरांशी ओळख झाली़ पगाराचे काम पाहणारे चव्हाण यांच्याशी ओळख झाली़ तेव्हा त्यांनी पैसे देऊन नोकरी लागते का, याबाबत विचारणा केली़ त्यांनी असा काही प्रकार होत नाही, असे सांगितले़ त्यांना कामावर येऊन एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला असताना पगार न झाल्याने त्यांनी उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांची त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन भेट घेऊन पगाराची विचारणा केल्यावर त्यांनी या महिलेला ओळखत नसल्याचे सांगितले व पैसे देऊन नोकरी लागते असा प्रकार होत नसल्याचे सांगितले़ त्यानंतर मोनिका सिंग यांच्या सांगण्यावरून त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़>सरकारी कार्यालयात कोणीही काम करू शकते?या सर्व प्रकारामुळे पोलीस चक्रावून गेले असून जिल्हाधिकारी कार्यालयात एखाद्या डेटा एंट्री आॅपरेटरच्या सांगण्यावरून एखादी महिला निवडणूक शाखेत येणारा व जाणारा सर्व पत्रव्यवहार पाहते़ त्याची नोंद करते़ इतरही काम महिनाभर करते़ तरीही तिची कोणतीही चौकशी होत नाही़ महिन्याभरानंतर उपजिल्हाधिकाºयांना समजते की ही महिला आपल्याकडे काम करत आहे.