शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

महिलांचे मतदान तुलनेने कमीच

By admin | Updated: February 22, 2017 03:24 IST

महानगरपालिका निवडणुकांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असताना मतदानाविषयीची महिलांची काही

पुणे : महानगरपालिका निवडणुकांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असताना मतदानाविषयीची महिलांची काही प्रमाणात उदासिनता कायम असून, सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच दरम्यानच्या १० तासांमध्ये एकूण ६०३८४ महिला, तर ६४८२३ पुरुषांनी मतदान केले. एकूण मतदानामध्ये महिलांचे प्रमाण तब्बल ४४३९ ने कमी आहे.सर्वच ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी असल्याचे विविध प्रभागांच्या आकडेवरुन दिसून येते. शनिवार - सदाशिव पेठ (प्रभाग क्रमांक १५) मध्ये २१२०१ महिलांनी आणि २२५७६ पुरुषांनी मतदान केले. रास्ता पेठ -रविवार पेठ (प्रभाग क्रमांक १७) मध्ये १९४१७ महिला, तर २२१४६ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला.पर्वती-नवी पेठ (प्रभाग क्रमांक २९) मध्ये १९७६६ महिला आणि २०१०१ पुरुष असे प्रमाण आहे. एकूण मतदानामध्ये महिलांचे प्रमाण तब्बल ४४३९ ने कमी आहे. सर्वच प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिला आणि अन्य मागासवर्गीय महिला किंवा मागास महिलांना विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली होती. यंदा ४ मतांमध्ये २ मते महिलांना हक्काने देता येत होती. असे असूनही मतदानाचे प्रमाण कमी आहे. तिन्ही प्रभागांचा विचार करता महिला आणि पुरुषांच्या मतदानातील तफावत सर्वांत कमी प्रभाग क्रमांक २९ मध्ये आहे. ३३५ महिलांनी मतदान केले असते, तर या प्रभागात महिला, पुरुषांचे समसमान मतदान होऊन इतिहास निर्माण झाला असता. १९७६६ महिला आणि २०१०१ पुरुष असे मतदानाचे प्रमाण आहे.महिला आणि पुरुषांच्या मतदानातील फरक सर्वाधिक प्रभाग क्रमांक १७ मध्ये असून, पुरुषांपेक्षा तब्बल २७२९ महिलांनी कमी मतदान केले आहे. १९४१७ महिला आणि २२१४६ पुरुष असे प्रमाण या ठिकाणी आहे. शहराचा पश्चिम भाग मानल्या जाणाऱ्या नारायण-शनिवार पेठ प्रभागात स्त्री- पुरुषांच्या मतदानात १३७५ मतांची तफावत आहे. २१२०१ महिलांनी आणि २२५७६ पुरुषांनी येथे मतदान केले आहे. पुरुष आणि महिलांचे लोकसंख्येतील प्रमाण असमान आहे. त्यामुळे पुरुषांच्या मतदानाच्या आकड्याप्रमाणे शंभर टक्के मतदान होणे शक्य नाही. तरीही घरातील काम, मतदान प्रक्रियेविषयी माहिती नसणे, मतदानाविषयी निरुत्साह आणि राजकीय जागरुकतेचा अभाव अशी काही कारणे महिलांचे मतदान कमी असण्यामागे असू शकतात.