शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

हिरेजडित दागिन्यांच्या ‘इंट्रिया’ला महिलांची उत्स्फूर्त पसंती

By admin | Updated: January 17, 2016 03:29 IST

हिरा हा महिलांचा ‘विक पॉइंट’च. हीच विशेष आवड लक्षात घेत, पारंपरिकतेसोबत नाजूक आधुनिक नक्षीकामाच्या अप्रतिम गुंफणीतून साकारलेल्या दागिन्यांची मालिका शनिवारी ‘इंट्रिया’

पुणे : हिरा हा महिलांचा ‘विक पॉइंट’च. हीच विशेष आवड लक्षात घेत, पारंपरिकतेसोबत नाजूक आधुनिक नक्षीकामाच्या अप्रतिम गुंफणीतून साकारलेल्या दागिन्यांची मालिका शनिवारी ‘इंट्रिया’ या प्रदर्शनातून तमाम महिलांना अनुभवता आली. हे प्रदर्शन रविवारीही ( दि. १७) खुले राहणार आहे. ख्यातनाम ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी व मुंबईचे प्रसिद्ध हिरे व्यापारी हर्निश शेठ यांनी आयोजित केलेल्या ‘इंट्रिया’ प्रदर्शनाचे सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू. मॅरिएट येथे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी आदित्य जावडेकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आले. त्यानंतर हिऱ्यांच्या लखलखाटात न्हालेल्या, नाजूक आकर्षक नक्षीकामात कोरलेल्या दागदागिन्यांचा खजिना पुणेकरांसाठी खुला झाला. ‘लोकमत मीडिया लिमिटेड’चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांची या वेळी विशेष उपस्थिती होती. पूर्वा दर्डा-कोठारी, सुनीत कोठारी, हर्निश शेठ, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रसिद्ध उद्योजिका उषा काकडे, रितू आणि प्रकाश छाब्रिया, शीतल रांका, वास्तुपाल रांका, भारत देसडला, सुरेखा मारू, प्रशांत बंब, विभा बंब, श्रेयन्स दुग्गड, ट्रीप्सी दुग्गड, प्रियंका वहा, श्रुती कर्णानी, अतुल सुराणा, वर्षा सुराणा, जया मुनोत, सविता शहा, रितीका ठक्कर, लतिका धारिवाल, कला ठक्कर, किशोर ठक्कर, लोकेश ठक्कर, डॉ. रुची श्रीवास्तव, आशा धवन, रक्षा खिंवसरा, पूनम ओसवाल, संगीता जैन, मधू जैन, अमृता चौधरी, श्वेता अगरवाल, नेहा साकला, नीता जैन, ॠषाल जैन, प्रतिमा दर्डा, अतुल दोशी, मीनल दोशी, स्नेहल दोशी, डॉ. निधी आगरवाल, मिता पारख, रिओना बियानी, नीता कोठारी, हर्षा कौसर, शालिनी लुंकड, प्रियंका राठी, डॉ. मेघना हर्डीकर, संगीता पोंगळे, रंजना जाधव, भाग्यश्री कदम, विमल जगताप, आदींनी प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली. या प्रदर्शनात पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम हिऱ्यांच्या दागिन्यातून पाहायला मिळत आहे. सर्जनशील आविष्कारातून घडविण्यात आलेली दागिन्यांची कलाकुसर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. हिरेजडित कर्णफुले, अंगठ्या, कंठहार, कफलिंक्स व अद्वितीय असे ब्रायडल सेट्स येथे पाहायला मिळत आहेत. हल्लीच्या तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवून इंडो-वेस्टर्न, पार्टीवेअर, लग्नसराई याबरोबरच्या कपड्यांच्या रंगसंगतीला सूट होतील अशा दागिन्यांची मालिकाच प्रदर्शनात सादर करण्यात आली आहे. हिरे आणि रुबी यांचा मेळ करून देखणे हार व कर्णफुलांचे सेट प्रदर्शनात पाहावयास मिळतात. मोठ्या आकारातील, वेगवेगळ्या राशींचे खडे असणाऱ्या, मीनाकाम, रोडियम या सगळ्यांमुळे अंगठ्या विशेष आकर्षक आहेत. त्याचप्रमाणे मोठे सेट्सही लक्षवेधी आहेत. ब्रेसलेट्स, रिंग्स, हे महिलावर्गाला आकर्षित करीत होते. त्यातील बारीक हिऱ्यांचे काम, नाजूकपणा आणि त्यातही जपलेला साधेपणा यामुळे सर्वांचीच कलेक्शनला पसंती मिळाली. त्याचबरोबर पुरुषांसाठी कफलिंक्स, पेन, ब्रेसलेटही प्रदर्शनाचे आकर्षण ठरत होते. या वेळी हिऱ्यांनी सजलेले हातावरचे घड्याळही अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवत होता. पहिल्या दिवशी पुण्यातील अनेक बड्या असामींनी भेटी देऊन खरेदीही केली.