शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यात पाण्यासाठी महिलांची होतेय पायपीट

By admin | Updated: April 25, 2017 03:57 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे उपलब्ध स्रोत दूर असल्याने नागरिकांना दूरवरची चढण चढत

दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे उपलब्ध स्रोत दूर असल्याने नागरिकांना दूरवरची चढण चढत पाणी आणावे लागत आहे. डोंगरावर वसलेल्या ठाकरवाद्यांना अद्यापही रस्ते नसल्याने ठाकरवाडीमधील महिलांना दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.खेड तालुक्यातील पूर्व भागातील वाकळवाडी, गोसासी, जऊळके खुर्द या गावांच्या ठाकरवाड्यांना भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांसह लहान मुलांना दीड-दोन किलोमीटर अंतरावरून हंड्यात पाणी घेऊन डोंगराची चढण लागत असल्याने महिलांची दमछाक होत आहे.निवडणुकामागून निवडणुका झाल्या; मात्र येथील गरीब आणि ठाकर समाजातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कधी झालीच नाही. शासन पिण्याचे पाणी देण्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करते. मात्र, या वाड्यावस्त्यांचे पिण्याच्या पाण्याचे कायमस्वरूपी योजनेचे प्रस्ताव कधी शासनदरबारी गेले नसल्याने दरवर्षी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून टँकर मागणीचे प्रस्ताव दिले जातात. त्यातही शासनाकडून केवळ एक किंवा दोन टँकर अनेक गावांसाठी सुरू करण्यात येतात. येथील नागरिकांना नेहमीच पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावाच लागत आहे. तालुक्यातील काही दानशूर व्यक्ती, संस्थांच्या माध्यमातून येथे टँकर पाठविण्यात येतो. (वार्ताहर)