शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘क्लीन सिटी’त महिलांची कुचंबणा

By admin | Updated: May 10, 2016 00:41 IST

क्लीन सिटी म्हणून देशात नववा व राज्यात पहिला पुरस्कार मिळविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात महिला स्वच्छतागृहांचा अभाव आहे.

सुवर्णा नवले, पिंपरीक्लीन सिटी म्हणून देशात नववा व राज्यात पहिला पुरस्कार मिळविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात महिला स्वच्छतागृहांचा अभाव आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे महिलांच्या पदरी कुचंबणा आली आहे. शहरात चकाचक चौपदरी रस्ते व कोट्यवधीचे उड्डाणपूल बांधले गेले. मात्र, मुख्य रस्त्यांवर व चौकांत सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा सर्वांना सोयीस्कर विसर पडला. स्वच्छतागृह उभारण्यासाठी जागा नसल्याचे सांगत प्रशासनाने हात वर केले. त्याच वेळी महिला पदाधिकाऱ्यांचेही महिलांच्या स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे उद्योगनगरीत कामाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या महिलांची कुचंबणा होऊ लागली आहे. त्यातून आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २२ लाख असून, नोकरदार महिलांची संख्या ५० हजारांहून अधिक आहे. मात्र, प्रमुख रस्त्यांवर मुतारी व स्वच्छतागृह दृष्टीस पडत नाही. गेल्या चार ते पाच वर्षांत नोकरदार महिलांची कामानिमित्त बाहेरगावी व शहरात ये-जा करण्याच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली. मात्र, त्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्या तुटपुंजी राहिली आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जी स्वच्छतागृहे आहेत. त्यांची परिस्थिती वापरण्यास योग्य नाही. झोपडपट्टीत रांगा...१मजूर महिलेपासून ते उच्चवर्गीय महिलांना नैसर्गिक विधीसाठी पुन्हा घरी यावे लागते. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे असणाऱ्या झोपडपट्टी भागात शौचालयासाठी आजही महिलांना सकाळच्या वेळी रांगा लावून ताटकळत उभे राहावे लागते. अद्यापही महिलांना स्वच्छतागृहांसाठी प्रतीक्षा करावी लागणे, ही दुर्दैवाची बाब आहे. ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’२शहरातील बस स्थानके, रेल्वे स्थानके, शासकीय व सार्वजनिक ठिकाणी तरंगती लोकसंख्या सर्वाधिक असते. त्यामध्ये महिलांचा वावर जास्त वाढला आहे. अशा ठिकाणी दररोजच्या धकाधकीच्या प्रवासात स्वच्छतागृहांअभावी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नोकरदार महिलांची कधी-कधी इतकी नाचक्की होते की, महिलांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. कामावरून घरी जात असताना रस्त्यात मुताऱ्याही आढळून येत नाहीत. त्यामुळे घरी पोहोचेपर्यंत आम्हाला त्रास सहन करावा लागतो. या समस्या खुलेपणानेही मांडता येत नाहीत, अशी व्यथा एक मजूर महिलेने ‘लोकमत’कडे मांडली.