येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षिका रोहिणी पानसरे, मनीषा लोखंडे, वंदना गोडसे, सत्यभामा पिंगळे, सुनंदा पाटील, हेमलता राऊत, रेखा बोत्रे ,मेघा गावडे,सुनंदा कारोटे,कविता आल्हाट,सुजाता गायकवाड उपस्थितीत होत्या.
विविध क्षेत्रांतील मान्यवर महिलांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सर्व शिक्षिकांना शाल,श्रीफळ, भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी, पोलीस सेवेतील पहिल्या पोलीस अधिकारी किरण बेदी, शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त मदर तेरेसा, गानकोकिळा लता मंगेशकर अशा अनेक मान्यवर महिलांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असेही खेडेकर म्हणाल्या, सूत्रसंचालन तुषार वाटेकर यांनी केले, तर आभार मनीषा लोखंडे यांनी मानले.