शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचत बाजार आता ‘महापौर’ बचत बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 16:11 IST

महिला बचत बाजार उपक्रमात महापौर मुक्ता टिळक यांनी बदल केला आहे. महापौर बचत बाजार असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेच्या राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजनेतंर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार.

पुणे : महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणार्‍या महिला बचत बाजार उपक्रमात महापौर मुक्ता टिळक यांनी बदल केला आहे. महापौर बचत बाजार असे त्याचे नामकरण करण्यात आले असून शहरातील एकूण ७ ठिकाणी तो आयोजित करण्यात येईल व दिवाळीनंतरही पुढे दर शनिवार, रविवार तो भरत राहील.  महापौर टिळक यांनीच ही माहिती दिली. महापालिकेच्या राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजनेतंर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात गेल्या काही वर्षात महिला बचत गटांची संख्या वाढली आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी या उपक्रमाचे स्वरूप विस्तारले असल्याचे महापौर म्हणाल्या. एकूण ३०९ महिला बचत गट तसेच वैयक्तिक स्वरुपात व्यवसाय करणार्‍या अनेक महिलाही यात सहभागी होणार आहेत.   दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ११ ते १५ आॅक्टोबर दरम्यान बालगंधर्व रंगमदिर आवार, गणेश कला क्रीडा मंदिर, वडगाव शेरी, पु. ल. देशपांडे उद्यान, मेंगडे जलतरण तलाव, महिला आधार केंद्र बाणेर व तुळशीबागवाले कॉलनी या ७ ठिकाणी महिला बचत बाजार भरेल. त्यात सहभागी होणार्‍या महिलांना महापालिकेच्या वतीने विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच यातील महिलांना महापालिकेच्या वतीने त्यांच्या वस्तुंचे पॅकेजिंग कसे करायचे, मार्केटिंग कसे करायचे याचे प्रशिक्षणही नंतर दिले जाणार आहे अशी माहिती महापौरांनी दिली. पुढील काळातही हे बाजार सुरू राहतील, त्यांची संख्याही वाढवली जाईल असे त्यांनी सांगितले.