शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शौचाला गेलेल्या महिलेवर अज्ञाताकडून हल्ला; एक डोळा निकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 12:02 IST

दुसरा डोळ्याला गंभीर इजा; डोळा वाचण्याची शक्यता कमी

न्हावरे : न्हावरे (ता.शिरुर ) येथे शेतमजूर महिला मंगळवारी ( दि.३) रात्री शौचाला गेली असता अज्ञात व्यक्तीने तिच्यावर हल्ला करून तिचा एक डोळा काढला आहे. तर एका डोळ्याला अत्यंत गंभीर स्वरूपाची दुखापत केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.या घटनेत मुक्ता राजू चित्रे (वय ४५ वर्ष ,रा.बिडगर -सूर्यवंशी वस्ती, न्हावरे, ता. शिरुर) या महिलेवर अज्ञात हल्लेखोराने हल्ला करून तिचा एक डोळा काढला आहे तर दुसऱ्या डोळ्याला गंभीर दुखापत केली आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते तिचा दुसरा डोळाही वाचण्याची शक्यता फार कमी आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या घटनेमुळे परिसरातील महिला वर्ग भयभयीत झाला असून या घटनेतील अज्ञात नराधम गुन्हेगाराला तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार न्हावरे परिसरातील बिडगर -सुर्यवंशीवस्ती येथे मुक्ता राजू चित्रे ह्या शेतमजूर महिला काल रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या झोपडीपासून काही अंतरावर लघवी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्या ठिकाणी एक पुरुष व्यक्ती येऊन त्यांच्याकडे पाहू लागला. त्यावर मुक्ता चित्रे त्याला म्हणाल्या, तुला काय बाईमाणूस दिसत नाही का ? त्यानंतर त्या अज्ञात गुन्हेगाराने मुक्ता चित्रे यांच्यावर हल्ला करून त्यांचा एक डोळा काढला. तर दुसऱ्या डोळ्याला गंभीर स्वरूपाची दुखापत केली. या महिलेवर करण्यात आलेल्या हल्ल्याचे स्वरूप इतके गंभीर होते की या महिलेचा एक डोळा जमिनीवर पडलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. घटनेनंतर काही वेळाने मुक्ता चित्रे यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता त्या घटनास्थळी निपचित अवस्थेत पडलेल्या होत्या. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच न्हावरे पोलिस दूरक्षेत्र केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे व पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. या महिलेला झालेली दुखापत पाहून पोलिसांनी या महिलेला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सांगितले. दरम्यान या शेतमजूर महिलेच्या कुटुंबियांकडे या महिलेला उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी पैसे नसल्याचे समजताच पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे यांनी माणसुकीच्या भावनेतून या महिलेवर उपचार करण्यासाठी दोन हजार रुपये दिले तसेच वाहनाची व्यवस्था करुन तिला ससून रुग्णालय (पुणे) येथे पाठवले. या घटनेतील गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख , बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे, पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे सहाय्यक पोलिस निरीक्षक ,बिरुदेव काबुगडे, प्रविण राऊत, विकास कापरे यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तपासाच्या दिशेने सुत्र हलवली. तसेच आज न्हावरे येथे  पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी करून पोलिस यंत्रणेला या गुन्ह्यासंदर्भात तपासाच्या दिशेने करावयाच्या कामाबाबत मार्गदर्शन केले. या महिलेवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेच्या तपासाचे व गुन्हेगाराचा शोध घेण्याचे काम पोलिस यंत्रणेकडून चालू आहे. क्रुर पध्दतीने पाशवी कृत्य करणाऱ्या या घटनेतील नराधमास लवकरच गजाआड करण्यात येईल. याकामी परिसरातील ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करावे असे अवाहन पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी केले आहे.