शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

गोलेगाव दर्ग्यात महिलांना प्रवेश

By admin | Updated: February 1, 2017 04:35 IST

गोलेगावचे ग्रामदैवत दावलमलीक येथे मुख्य गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्यात आला. तसेच बाळासाहेब ज्ञानदेव गायकवाड यांनी रचलेल्या आरतीचीही सुरुवात करण्यात

गोलेगाव : गोलेगावचे ग्रामदैवत दावलमलीक येथे मुख्य गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्यात आला. तसेच बाळासाहेब ज्ञानदेव गायकवाड यांनी रचलेल्या आरतीचीही सुरुवात करण्यात आली असून पहिल्या आरतीचा मान माया व विनायक महाजन या उभयतांना देण्यात आला. निसर्गसंपन्न दावलमलीक टेकडीवर असणारा हा दर्गा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. एक जागृत देवस्थान असल्याची लोकांची भावना असल्यामुळे येथे नेहमीच पंचक्रोशीतील हिंदू व मुस्लिम भक्तांची वर्दळ असते. येथील उरूस चैत्र कृष्ण त्रयोदशीला असतो. गनिभाई तांबोळी हे सेवेकरी येथे सेवा करतात. तसेच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुमारे सात ते आठ वर्षांपासून या ठिकाणी पशुहत्या बंद केलेली आहे. दर गुरुवारी एखादा दाता मिष्टान्नाचा महाप्रसाद या ठिकाणी देत असतो. अतिशय निसर्गसंपन्न वातावरणात टेकडीवर असलेल्या या ठिकाणावरून समोरचा घोडनदीवर बांधलेल्या चिंचणी धरणाचा पाण्याचा फुगवटा डोळ्यात साठवण्याजोगा आहे. मोर, हरीणही येथे हजेरी लावतात. नागमोडी वळणे घेत टेकडीवर चढणे म्हणजे एकप्रकारे सुखद अनुभवच वाटतो. पावसाळ्यात वाहणारे झरे व ओढे पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळेच एक पर्यटनाचे ठिकाण म्हणून ही टेकडी अलीकडच्या काळात नावारूपाला येत आहे. गोलेगाव येथील तेजस्विनी महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण, सदस्या सुमन भोगावडे, कुमुदिनी बोऱ्हाडे, अनिता वर्पे, अर्चना पडवळ, वनिता जगदाळे, शैला गायकवाड या महिलांनी उपस्थितांसमोर दर्ग्यात प्रवेशाचा प्रस्ताव मांडला. त्याला ताबडतोब सरपंच अनुपमा वाखारे, उपसरपंच सुनील भोगावडे व उपस्थितांनी मान्यता दिल्याने एक ऐतिहासिक क्षण असल्याची भावना महिला कार्यकर्त्या चव्हाण यांनी व्यक्त केली. या प्रसंगी गोलेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन भगतसिंग वाखारे, बबन वाखारे, दिलीप लोखंडे, शरद भोगावडे, संतोष वर्पे, सुनील पडवळ, मच्छिंद्र गायकवाड, खंडू बोऱ्हाडे, तुळशीराम पवार, मच्छिंद्र सांगळे, नामदेव महाजन आदी उपस्थित होते.