शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोंबड्यांच्या भांडणावरून महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:29 IST

कोंबड्या घरांत शिरल्या म्हणून झालेल्या भांडणावरून चिडून पत्नीच्या सांगण्यावरून शेजा-याने महिलेच्या तोंड व गळ्यावर कु-हाडीने वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना आळंदी म्हातोबाची येथे रात्री आठच्या सुमारास घडली.

लोणी काळभोर : कोंबड्या घरांत शिरल्या म्हणून झालेल्या भांडणावरून चिडून पत्नीच्या सांगण्यावरून शेजा-याने महिलेच्या तोंड व गळ्यावर कु-हाडीने वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना आळंदी म्हातोबाची येथे रात्री आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी ज्ञानेश्वर गोरख जाधव (वय २२, रा. आळंदी म्हातोबाची, कोळसकर वस्ती, ता. हवेली) यांनी आपली मावशी नंदा रामदास माळी (वय ४५) हिचा खून शेजारी रहाणारे अनिल तुकाराम रणदिवे याने पत्नीच्या सांगण्यावरून केला असल्याची फिर्याद दिली आहे. खून करून रणदिवे आपल्या पत्नीसह फरार झाला आहे.गुरुवार (२३ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी रणदिवे यांच्या कोंबड्यांनी नंदा यांच्या झोपडीत घुसून गृहोपयोगी साहित्याची पडझड केल्याचे कारणांवरून दोघींमध्ये वाद चालला होता. थोड्या वेळाने दोघी शांत झाल्या व आपापल्या घरी गेल्या.रात्री आठच्या सुमारास अनिल रणदिवे व पत्नी रुक्मिणी हे नंदा हिला जाब विचारण्यासाठी गेले. रुक्मिणी ही आपल्या पतीस ‘ही माझ्याशी सारखीच कोंबड्यांवरून भांडण करते. हिच्याकडे बघाच’ म्हणली. त्यानंतर अनिल याने ‘तू माझ्या बायकोबरोबर भांडतेस काय,’ असे म्हणत हातातील कुºहाडीने नंदा यांच्यावर घावघातला. यामुळे त्या जमिनीवर कोसळल्या त्यानंतर त्याने तोंड व गळ्यावर सपासप वार केल्याने नंदा या तडफडू लागल्या. हे पाहूनतिला सोडवून अनिलला पकडण्यासाठी जाधव कुटुंबीय व अंकुश लोंढे हे पुढे आले असता त्याने त्यांनाही कुºहाडीने मारण्याची धमकी दिल्यामुळे कोणी पुढे आले नाही.याचा फायदा उठवून अनिल रणदिवे हा पत्नीसमवेत फरार झाला. तोपर्यंत त्या मयत झाल्या होत्या. पोलिसांनी रात्रभर अनिल रणदिवे व त्याच्या पत्नीचा शोध घेतला, परंतु ते दोघेही सापडले नाहीत.