शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

महिला उपचाराविना बराच वेळ खड्ड्यात पडून राहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:12 IST

जुन्नर : कोरोनाकाळात अनेकदा माणुसकी कुठे शिल्लक आहे का नाही, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली. रुग्णालयापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत सर्वच ...

जुन्नर : कोरोनाकाळात अनेकदा माणुसकी कुठे शिल्लक आहे का नाही, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली. रुग्णालयापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत सर्वच ठिकाणी रक्ताच्या नात्यांनी कोरोनाच्या भीतीने आपल्या माणसाकडे पाठ फिरवली. पण, याचवेळी समाजात स्वतःचा जीव धोक्यात घालून माणुसकी जपण्यासाठी अहोरात्र धडपडणारे असंख्य 'रिअल हिरो' अवतीभोवती पाहायला मिळाले आणि कोरोनासारख्या बलाढ्य संकटाला टक्कर देण्याची हिंमतही समाजाला मिळत गेली. अशीच एक घटना जुन्नर येथे घडली. एकटी असणाऱ्या एका कोरोनाबाधित महिला मदतीसाठी कुणीही पुढे न आल्यामुळे बराच वेळ उपचाराविना एका खड्ड्यात पडून राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

जुन्नर शहरातील पंचलिंग मंदिराजवळ असलेल्या झोपडपट्टीमधील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, तिच्यामुळे आपल्याला कोरोना होईल, या भीतीने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी बराच काळ कोणीही पुढे आले नाही. बरेच तास ती विनाउपचार बेवारस अवस्थेत एका खड्ड्यात पडून राहिली. शेवटी जुन्नर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दीपेशसिंह परदेशी यांनी तिला स्वत: उचलून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर शहरातील पंचलिंग मंदिराजवळ असलेल्या झोपडपट्टीमधील एका महिलेला कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यावर तिने तपासणी करून घेतली. तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या महिलेची तब्येत आणखी बिघडली. अशावेळी परिसरातील नागरिकांनी विचारपूस करण्याची किंवा तिच्या उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यासाठी कोणतीही धावपळ केली नाही. संबंधित महिला एका खड्ड्याचा आधार घेत तिथेच पडून राहिली.

हा धक्कादायक प्रकार काही लोकांनी जुन्नर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष दीपेशसिंह परदेशी यांच्या कानावर घातला. परदेशी यांनी त्यांचे सहकारी नवनाथ नेटकेसह तत्काळ रुग्णवाहिकासह घटनास्थळी धाव घेतली. आणि या अस्वस्थ महिलेला स्वतः उचलत पुढील उपचारासाठी संबंधित ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या घटनेची माहिती परिसरात ज्यावेळी वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांनी परदेशी यांच्या धाडसासह त्यांनी दाखविलेल्या माणुसकीसाठी कौतुकाचा वर्षाव केला.

कोविडच्या संकटात दीपेशसिंह परदेशी यांनी पहिल्यापासून सर्वतोपरी योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांनी कोविड रूग्ण आणि नातेवाईकांना मोफत डबे, प्लाझ्मा, आवश्यक ती औषधांसह कोणत्याही मदतीच्या पूर्ततेसाठी दीपेशसिंह परदेशी नेहमीच पुढे राहिले असल्याचे नागरिकांनी सांगितले.