शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात पावणेसात कोटींचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:16 IST

एफडीएची कारवाई : २७ वाहने जप्त; १८ गोदामे, दुकाने सील

पुणे : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या वर्षभरात शहर आणि जिल्ह्यातून गुटखा, पानमसाला आणि सुगंधित सुपारीचा तब्बल पावणेसात कोटी रुपयांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी २७ वाहने जप्त करण्यात आली असून, तब्बल १८ गोदामे व दुकाने सीलबंद करण्यात आली आहेत.राज्यात मागील काही वर्षांपासून गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारीवर बंदी आहे. दरवर्षी या बंदीची मुदत वर्षभरासाठी वाढविण्यात येते. या वर्षी ही मुदत संपल्याने एफडीएने दि. २० जुलै रोजी बंदीला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. गुटखाबंदीला सहा आणि सुगंधित सुपारीवरील बंदीला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. यानंतरही शहरात अवैधमार्गाने मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि पानमसाला सर्रासपणे मिळताना दिसतो. त्यामुळे एफडीएकडून संबंधितांवर सातत्याने कारवाई केली जाते. मागील वर्षभरात एफडीए आणि पोलिसांनी मिळून गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त केला आहे.एफडीएने शहरात गुटखाविक्री तसेच साठा करणाऱ्यांवर स्वतंत्रपणे ७७ आणि पोलिसांच्या सहकार्याने ५८ अशा एकूण १३५ आणि जिल्ह्यात ७५ कारवाया केल्या आहेत. या कारवाईत शहरातून १ कोटी १५ लाख ७७ हजार ६८९, तर जिल्ह्यातून ६ कोटी ८० लाख ७४ हजार ९०८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. गुटख्याच्या अवैध वाहतूकप्रकरणी २७ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. न्यायालयात या प्रकरणी शहर परिसरातून २७ आणि जिल्ह्यात ३८ खटले दाखल करण्यात आले आहेत.वारंवार गुटखा तस्करीचे गुन्हे करणाºया ८ व्यक्तींविरोधातमहाराष्ट्र प्रिव्हेंशन आॅफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटिज (एमपीडीए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एफडीएतील अधिकाºयांनी दिली.वर्षभरातील मोठ्या कारवाया१६ मार्च २०१८ रोजी खेड येथे अहमदाबाद येथून आलेला तब्बल २ कोटी ३२ लाख ८० हजार रुपयांचा ४ ट्रक गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त. एफडीए आणि पोलिसांकडून संयुक्तपणे कारवाई.मार्च २०१८ मध्ये खेडमधील खुरली येथे ३२ लाख ८० हजार रुपये किमतीचा पानमसाला आणि सुगंधित सुपारीचा साठा जप्त.पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पुणे विभागात ३०१ ठिकाणी केलेल्या कारवाईत ११ कोटी २६ लाख ३२ हजार रुपयांचा साठा जप्त.

टॅग्स :FDAएफडीएPuneपुणे