शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक होणार वेळेमध्येच, पुणे बार असोसिएशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 05:25 IST

सनद पडताळणी आणि त्याप्रमाणे मतदारयादी तयार करण्यास विलंब लागण्याची शक्यता असल्याने यंदा पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीची पारंपरिक तारीख टळण्याची चर्चा होती

पुणे : सनद पडताळणी आणि त्याप्रमाणे मतदारयादी तयार करण्यास विलंब लागण्याची शक्यता असल्याने यंदा पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीची पारंपरिक तारीख टळण्याची चर्चा होती. मात्र, निवडणूक ३१ जानेवारी अथवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा निर्णय पुणे बार असोसिएशनच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला.बार कौन्सील आॅफ महाराष्ट्र आणि गोवाच्या निवडणुकीची प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निवडणुकीसाठी सनद पडताळणी केलेल्या वकिलांची यादी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने १० जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र, ती यादी आता ४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. पुणे बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक काही वर्षांपासून ३१ जानेवारी रोजी होत असते. या पार्श्वभूमीवर, पुणे बार असोसिएशनच्या प्रथेनुसार पावत्या काढून मतदार यादी तयार करून निवडणूक घ्यायची की निवडणूक लांबवून बार कौन्सिलच्या यादीप्रमाणे निवडणूक घ्यायची, हा प्रश्न निर्माण झाला होता.यातून मार्ग काढण्यासाठी पुणे बार असोसिएशनच्या वतीने सोमवारी शिवाजीनगर न्यायालयातील हिरवळीवर वकिलांची सभा घेतली. बारचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र दौंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस असोसिएशनचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष, वकील उपस्थित होते. या बैठकीत पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकिलांनी आपली भूमिका मांडली. बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाच्या निवडणुकीसाठी मतदारयादीत सध्या गोंधळ आहे. त्यात अनेक त्रुटी आहेत. ही मतदार यादी तयार होण्यास तसेच त्यातील चुका दुरुस्त करण्यात बराच वेळ जाणार आहे.