वडगाव मावळ - पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रांत आज स्त्रियांचा वावर भूषणावह आहे. मात्र पूर्वीच्या काळात स्त्रियांचा वावर मोजकाच होता. त्याचे प्रतिबिंब लेखनीतून उमटले, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.मावळ तालुक्यातील निगडे गावच्या कन्या असलेल्या अरुणा ढेरे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार मावळ पंचायत समितीच्या सभागृहात झाला. जेष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील, गटशिक्षणाधिकारी मंगला वाव्हळ, ज्येष्ठ कवी उद्धव कानडे, भारत ठाकूर, मनोज भांगरे उपस्थित होते.ढेरे म्हणाल्या, ‘‘मावळच्या मातीचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे. या मातीतील सन्मान सोहळा कायम स्मरणात राहील. या मातीशी जोडलेले ऋनानुबंध कायम जखडून राहतील.’’उपसभापती शांताराम कदम यांनी निगडे ग्रामस्थांच्या वतीने ढेरे यांना नागरी सत्काराचे निमंत्रण दिले. संजय जगताप यांनी प्रास्ताविक केले. उमेश माळी यांनी सूत्रसंचालन केले. साहेबराव कारके यांनी आभार मानले. दरम्यान, पत्रकार विजय सुराणा, ज्ञानेश्वर वाघमारे, गणेश विनोदे, रामदास वाडेकर यांच्या हस्ते ढेरे यांचा सत्कार करण्यात आला.
सर्वच क्षेत्रात महिलांचा वावर भूषणावह - अरुणा ढेरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 00:56 IST