शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खोरचा पाणीप्रश्न सोडविणार

By admin | Updated: April 25, 2017 03:53 IST

सांसद आदर्श ग्राम योजनेतून खोर (ता. दौंड) या दत्तक घेतलेल्या गावाचा पाणीप्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे आश्वासन खासदार वंदना चव्हाण यांनी दिले आहे.

खोर : सांसद आदर्श ग्राम योजनेतून खोर (ता. दौंड) या दत्तक घेतलेल्या गावाचा पाणीप्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे आश्वासन खासदार वंदना चव्हाण यांनी दिले आहे.चव्हाण यांनी शनिवारी खोरला भेट देऊन सांसद आदर्श ग्राम योजनेतून कोणकोणती विकासकामे प्राधान्यांनी करता येतील, याविषयी ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. खोर हे गाव गेल्या वर्षापासून पाण्याच्या प्रश्नावर लढत आहे. या गावाच्या उशाला असलेल्या सिंचन योजनेतून पाणी मिळावे, म्हणून ग्रामस्थांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे. परंतु अद्यापपर्यंत या भागाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात यश आले नाही. दौंड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामचंद्र चौधरी, पंचायत समितीचे सदस्य नितीन दोरगे, सरपंच सुभाष चौधरी यांनी सांसद आदर्श योजनेतून खोर गावचा पाणीप्रश्न मार्गी लावला तरी हे गाव आदर्श होईल. या वेळी खासदार वंदना चव्हाण यांनी खासदार निधीतून तरतूद करून जनाई-शिरसाई योजनेतून कायमस्वरूपाची बंदिस्त पाईपलाईन पद्मावती तलावापर्यंत आणणार असल्याचे सांगितले तर दुसरीकडे पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी पाझर तलावापर्यंत बंदिस्त पाईपलाईन करून पाणी आणणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या वेळी तहसीलदार विवेक साळुंखे, कृषी विभागाचे जरांडे, मधुकर चव्हाण, सुहास चौधरी, शिवाजी चौधरी, बाळू डोंबे, निवृत्ती चौधरी, संजय डोंबे, सोपान शेंडगे, भगवानराव चौधरी, दिलीप डोंबे, मारुती चौधरी, संजय डोंबे, तलाठी रमेश कदम, ग्रामसेवक अशोक लोणकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)