शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

वन्यप्राण्यांची पाण्याची वणवण थांबणार

By admin | Updated: April 25, 2017 03:54 IST

वीसगाव खोऱ्यातील वन्यप्राण्यांची उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने डोंगर परिसरात बशीतळी व प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये वन विभागाकडून पाणी सोडण्यात आले आहे़

नेरे : वीसगाव खोऱ्यातील वन्यप्राण्यांची उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने डोंगर परिसरात बशीतळी व प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये वन विभागाकडून पाणी सोडण्यात आले आहे़वीसगाव खोऱ्यातील डोंगररांगांच्या जंगल परिसरात हरिण, तरस, लांडगे, ससा, मोर, लांडोरी यांसारखे पशुपक्षी व वन्यप्राणी यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे़ वन्यपाणी व पशुपक्षी अन्न व पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे धाव घेतात़ डोंगरभागात पाण्याची तीव्र टंचाई असल्याने प्राण्यांचे, पक्ष्यांचे मोठे हाल होत होते़ याची लोकमतने पाहणी करून वन्यप्राणी, पशुपक्ष्यांची पाण्यासाठी वणवण असे वृत्त दिले होते. याची दखल घेत वनविभागाने त्वरित ठिकठिकाणच्या बशीतळी व जमिनीत गाडलेल्या प्लॅस्टिक टाक्यांमध्ये पाणी सोडण्यात आले आहे़ यामुळे या भागातील वन्यप्राण्यांचे, पक्ष्यांचे पाण्यासाठी सध्या तरी होणारे हाल थांबणार आहेत. बालवडी (ता. भोर) येथील तरुण व ग्रामस्थांनी स्वखर्चाने छोट्या-छोट्या प्लॅस्टिक टाक्या टाकून प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी तळी बनविली आहेत. बाजारवाडी येथे तयार असलेल्या या टाक्यांत दोन दिवसांत वनविभाग पाणी सोडणार असल्याचे वनपाल एस़ ए़ काळे यांनी सांगितले़(वार्ताहर)