शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Video : पुण्यात पुन्हा गव्याचं दर्शन; प्रशासनासमोर गव्याच्या सुखरुप सुटकेचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 13:55 IST

बावधन येथील एच सी एम आर एल पाषाण तलावाजवळ असलेल्या भिंतीजवळ आढळला गवा

पुणे: बावधन येथील एच सी एम आर एल पाषाण तलावाजवळ असलेल्या भिंतीजवळ गवा आढळून आला आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात असलेली वाहने व एचटीएमएलची भिंत या दोन्हीमध्ये गवा असल्याने या दाव्याला हाताळणे  कठीण जात आहे. गवा महामार्गावर येऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे.बावधन येथील हायवेलगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्यापलीकडे जंगलात हा गवा आलेला आहे. त्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. रेस्क्यू करण्याचे काम सुरू असून नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.१३ दिवसांपूर्वीच ९ डिसेंबरला कोथरूड परिसरात आलेल्या गव्याला रेस्क्यू करताना उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुण्यात पुन्हा एकदा गवा आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कोथरूडमध्ये आलेल्या गव्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त केली गेली होती. त्यानंतर आज पुन्हा गवा आल्यानंतर प्रशासनाची आणि रेस्क्यू टीमची मोठी त्रेधातिरपीट उडाली आहे. या गव्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

परिसराची संपूर्णपणे पाहणी करून गव्याला एचईएमआरएल च्या कंपाउंडमध्ये असलेल्या जंगलामध्ये परत पाठवण्यासाठी आखणी केली जात आहे. महामार्ग लगत संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल मागवण्यात आले आहे. पोलीस दलाच्या अतिरिक्त तुकड्या दाखल झाल्या असून महामार्गालगत तात्पुरते संरक्षण तयार करून त्याला पुन्हा त्याच्या आदिवासा मध्ये सोडण्यासाठी चे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

पाच तास उलटून गेल्यानंतर हे अद्याप गव्याला पकडण्यामध्ये वन विभागाला अपयश..  

पाच तास उलटून गेल्यानंतर हे अद्याप गव्याला पकडण्या मध्ये वन विभागाला यश आले नाही.रेस्क्यू टीमला देखील गावाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मध्ये सोडण्यासाठी मार्ग सापडत नसल्याने अद्याप गवा महामार्ग व एच ई एम आर एल मधील जागेतच वावरताना दिसत आहे.स्थानिक ग्रामस्थांच्या मते एचईएमआरएल परिसरामधील गवे अनेकदा गाई म्हशीं बरोबर कंपाऊंडच्या बाहेर येतात. व त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये परत जातात.अनुभवाची कमतरता असलेली टीम असल्याने गव्याला नैसर्गिक अधिवासामध्ये परत पाठवणे मध्ये यश मिळत असल्याची चर्चा सध्या होत आहे. स्थानिक गोपालक व म्हशी पाळणाऱ्या नागरिकांच्या मदतीने गोव्याला नैसर्गिक आदिवासात सोडण्यासाठी वाटांचा शोध घेतला जात आहे.