पुणे : रागाच्या भरात दोरीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना बाणेर येथील माऊली गार्डन येथे घडली. आरोपीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे. शोभा शेरबहाद्दूर थापा असे मृत महिलेचे नाव आहे. शेरबहाद्दूर जब्बरसिंग थापा (वय ४०, रा. उज्ज्वल शिरीन, बी बिल्डिंग टेरेसवरील रूम, माऊली गार्डन, बाणेर, मूळ रा. नेपाळ) याला अटक करण्यात आली आहे. मृत महिलेची भाची पूजा राठोड (वय २५, रा. खराबवाडी, चाकण, मूळ रा. मु. पो. किल्लारी, ता. औसा, जि. लातूर) हिने फिर्याद दिली आहे. आरोपीवर ३०२ कलमांतर्गत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सहायक पोलीस निरीक्षक संदीप केंजळे तपास करीत आहेत.
गळा आवळून पत्नीचा खून
By admin | Updated: April 25, 2017 04:01 IST