आळेफाटा : राजुरी (ता. जुन्नर) परिसरात एका विवाहित महिलेचा तिच्या पतीने गळा दाबून खून केला. तिला गळफास लावून आत्महत्या असल्याचे भासवण्याचा पतीचा बनाव उघड झाला. आळेफाटा पोलिसांनी तातडीने केलेल्या प्राथमिक तपासात खुनाची घटना निष्पन्न झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करीत संबंधिताला अटक केली.निर्मला एकनाथ डुंबरे (वय ३२, डुंबरपट्टा) असे महिलेचे नाव असून एकनाथ शिवाजी डुंबरे असे पतीचे नाव आहे. आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार राजुरी परिसरातील डुंबरपट्टा येथील घरातील लाकडाला निर्मला यांचा मृतदेह लटकत असल्याचे नातेवाईकांच्या काल सायंकाळच्या सुमारास लक्षात आले. यानंतर पोलीस व संबंधित महिलेचे माहेरचे नातेवाईक घटनास्थळी आले. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने ओतूर नारायणगाव येथील पोलीस यानंतर घटनास्थळी आले.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. या महिलेला पती दारू पिऊन वेळोवेळी त्रास देत असल्याचे समजले.उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संदीप म्हस्के तपास करीत आहेत.गुन्ह्याची कबुलीपोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पतीचा परिसरातून शोध घेतला. अखेर रात्री उशिरा तो सापडल्यानंतर ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच एकनाथ डुंबरे याने पत्नीचा गळा आवळून खून केला असल्याची कबुली दिली. निर्मला यांचे भाऊ एकनाथ चिमाजी पाडेकर यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पत्नीचा गळा दाबून खून
By admin | Updated: December 8, 2015 00:08 IST