शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण निश्चित

By admin | Updated: July 14, 2016 00:40 IST

पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथील रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. प्रस्तावित करण्यात येणाऱ्या रस्त्यामध्ये दोन्ही बाजूने

नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथील रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. प्रस्तावित करण्यात येणाऱ्या रस्त्यामध्ये दोन्ही बाजूने अडीच मीटर डांबरीकरण व अडीच मीटर मुरुमीकरण करण्यात येऊन रस्ता रुंद करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला जाणार आहे़ नारायणगाव शहरातील रुंदीकरण पावसाळ्यानंतर व चार पदरी रस्ता रुंदीकरणाप्रसंगी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बुलंद छावा संघटनेला दिली़ त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण होणार, हे निश्चित झाले आहे़ नारायणगाव शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी, तसेच रस्त्याची झालेली दुरवस्था या संदर्भात बुलंद छावाच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्ष पराग हांडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता़ प्राधिकरणाच्या वतीने आंदोलन करू नये, अशा आशयाचे पत्र देऊन रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले व प्रस्तावित रुंदीकरणासंदर्भात त्यांनी पराग हांडे यांना माहिती दिली़ बुलंद छावा व नागरिकांच्या मागणीनुसार सध्या सुरू असलेल्या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण करण्याची मागणी केल्याने त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक विभागाच्या वतीने लवकरच रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे़ या प्रस्तावासाठी नारायणगाव व वारुळवाडी ग्रामपंचायतींचा ठराव घेण्यात येणार आहे़ हा ठराव मिळाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या नारायणगाव महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येईल़ प्रस्तावित रुंदीकरणानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूने अडीच/अडीच मीटरचे डांबरीकरण करण्यात येणार आहे़ डांबरीकरणालगत दोन्ही बाजूने अडीच/अडीच मीटर मुरुमीकरण करण्यात येईल़ त्यानंतर डे्रनेज व फुटपाथ करण्यात येणार आहे़ (वार्ताहर)