शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारवाड्यात वाय-फाय सुविधा

By admin | Updated: March 3, 2016 01:43 IST

सध्याच्या काळात अत्यावश्यक गरज बनलेली इंटरनेटची सुविधा आता शनिवारवाडा परिसरामध्ये मोफत उपलब्ध होणार असून

पुणे : सध्याच्या काळात अत्यावश्यक गरज बनलेली इंटरनेटची सुविधा आता शनिवारवाडा परिसरामध्ये मोफत उपलब्ध होणार असून, त्याकरिता राज्य शासनाने ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या महिनाभरात ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवार वाड्यामध्ये लॅपटॉप आणि स्मार्ट फोनमध्ये इंटरनेटचा लाभ घेण्यासाठी तरुण-तरुणी व पर्यटकांची लगबग वाढणार आहे. पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारा शनिवारवाडा बाजीराव-मस्तानी चित्रपटानंतर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. शनिवार वाड्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर शनिवार वाड्यात मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन मंडळामार्फत याकरिता महापालिकेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यानुसार टेंडर प्रक्रिया राबवून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती योजनेचे समन्वयक व महापालिकेचे अधीक्षक अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी दिली.शनिवारवाड्याची दैनंदिन देखभाल पुरातत्त्व विभागामार्फत केली जाते. वाय-फाय सुविधेबरोबरच शनिवारवाडाही आता हायटेक होणार आहे. शनिवाड्याच्या तिकीट काउंटरवर नोंदणी केल्यानंतर वाय-फाय सुविधेचा कोड नंबर पर्यटकांना दिला जाणार आहे. तो कोड नंबर लॅपटॉप, स्मार्ट फोनमध्ये टाकल्यानंतर ही सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी महाविद्यालयातील तरुण-तरुणी, फिरते व्यावसायिक यांची गर्दी आता शनिवारवाड्यावर वाढणार आहे.