शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

By श्रीकिशन काळे | Updated: April 27, 2024 20:33 IST

Mahesh Manjrekar in Pune: जर एखादा क्रीडामंत्री खेळाडूला बनवले किंवा एका चांगल्या शिक्षकाला शिक्षणमंत्री केले तर काय बिघडते ?

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘‘सध्या राजकारणाची स्थिती अत्यंत वाईट झालीय. तुम्हाला देश चालवायचा असतो. पण तुमची तेवढी पात्रता आहे का ? राजकीय लोकं मंत्री होतात. त्यांची पात्रता किमान बारावी पास तरी असायला हवी. जर एखादा क्रीडामंत्री खेळाडूला बनवले किंवा एका चांगल्या शिक्षकाला शिक्षणमंत्री केले तर काय बिघडते ? उलट ते चांगल्याप्रकारे काम करतील,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्ट्यावर शनिवारी (दि.२७) मांजरेकर बोलत होते. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी आदी उपस्थित होते.

राजकारणात प्रत्येकाने रूची घेणे गरजेचे आहे. तुम्ही प्रश्न विचारत नाही. मला खूप वाटतं की, अनेकांनी यात यायला हवे. जयललिता, एनटी रामाराव पासून अनेकांनी दोन्हीकडे चांगले काम केले. राजकीय लोकांना आता वाटते की, अभिनेत्यांनी राजकारणात यावे.

राजकारणी हे डिग्री घेऊन येत नाहीत. मला असं वाटतं की, जे संवेदनशील आहेत, त्यांनी राजकारणात यावे. एखाद्या कार्यालयात शिपायाची जागा आहे, त्यालाही बारावीची पात्रता लागते. जो देश चालवतो, तिथे निदान बारावी पास तरी हवा. तुम्ही देश चालवणार आहात. शिपायाकडून अपेक्षश करता की त्याने बारावी पास असावा. एवढा मोठा देश आहे .नाही तर तुम्ही नियुक्त्या करता. एखादा डॉक्टरला आरोग्य मंत्री करा ना, एकादा टिचर शिक्षणमंत्री करा ना. आज ज्याने बॅट उचलली नाही तो क्रीडामंत्री असतो. हे एक मॉडेल म्हणून करायला काहीच हरकत नाही.

आज आयडॉलॉजी राहिलेली नाही. मला कोणाला मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न आहे. कोणी कुठेही आहे. सर्व कन्फ्युजन आहे, असे मांजरेकर म्हणाले.

टॅग्स :Mahesh Manjrekarमहेश मांजरेकर Politicsराजकारण