मंचर : गेली २७ वर्षे तुम्ही आमदार आहात तसेच मंत्री होता. सरकारही तुमचे होते. मग बैलगाडा शर्यत का सुरू केली नाही? असा सवाल करीत शेवटी बैलगाडा शर्यती मीच सुरू करणार आहे, असे आश्वासन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. आढळराव पाटील म्हणाले, की आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी घराणेशाही आणू पाहत आहेत. साखर कारखाना, बँक व सगळ्या संस्थांवर तुमच्याच कुटुंबातील माणसे कशी, असा सवाल त्यांनी केला. खासदारांमुळे विमानतळ खेड तालुक्यातून गेले असे कोणी म्हणू लागले आहेत. फक्त एकट्या खासदार आढळराव यांच्या सांगण्यामुळे विमानतळ खेडमधून हद्दपार होऊ शकते का, असा सवाल त्यांनी केला.या वेळी सहसंपर्कप्रमुख अविनाश रहाणे, सुरेश भोर, सचिन बांगर, प्रज्ञा भोर, वसंत राक्षे, स्नेहल पोखरकर, विजय गावडे, माजी सरपंच संतोष गावडे यांची भाषणे झाली. दीपक पोखरकर यांनी आभार मानले.(वार्ताहर)
मग बैलगाडा शर्यत का सुरू केली नाही? : आढळराव
By admin | Updated: February 17, 2017 04:33 IST