शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

"मुख्यमंत्री ओबीसींकडे लक्ष का देत नाहीत?"; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 07:35 IST

बारा कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री ६० टक्के असलेल्या ओबीसींची बाजू समजून घेण्यासाठी का येत नाहीत

पुणे : मराठा आंदोलन सोडविण्यासाठी मुख्यमंत्री स्वत: दोनवेळा गेले होते. दुसरीकडे ओबीसी आंदोलन सोडविण्यासाठी राज्य सरकारने पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ व इतर ओबीसी नेत्यांना पाठवले; परंतु मुख्यमंत्री आले नाहीत.  बारा कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री ६० टक्के असलेल्या ओबीसींची बाजू समजून घेण्यासाठी का येत नाहीत, असा सवाल ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघात ‘वार्तालाप’ कार्यक्रमात शनिवारी ते बोलत होते. यावेळी हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मराठा आंदाेलनाचे नेते मनाेज जरांगे यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले. हाके म्हणाले, मुख्यमंत्री राज्यात बारा कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करतात; परंतु मराठा आंदाेलनाची दखल त्यांनी जशी घेतली तशी ओबीसी आंदाेलनाची घेतली नाही. सरकार मात्र ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करीत आहे, हे त्यांच्या वागण्यावरून दिसून येते. 

ओबीसी आरक्षण दिल्यावर मराठा समाजाचा विकास होईल असे नाही. दोन समाजांत भांडण लावल्यावर प्रश्न सुटत नाही. दुसरीकडे जरांगे-पाटील म्हणतात आम्ही खूप काही खाल्ले; पण अर्थसंकल्पात केवळ एक टक्के निधी दिला जाताे. त्यामुळे समाजातील विचारवंत, निवृत्त न्यायाधीश, कायदेतज्ज्ञ मंडळींनी यावर बोलले पाहिजे, असेही ते म्हणाले.

छगन भुजबळांना टार्गेट केले जाते

जरांगे पाटलांकडून ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांना टार्गेट केले जाते. ते मंत्री असले तरी ओबीसी समाजासाठी ठोस भूमिका त्यांनी घेतली आहे, असे सांगत मागासवर्गीय आयाेग हा आमदार, खासदारांच्या निर्देशाने चालतो, असा आराेप हाके यांनी केला. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणlaxman hakeलक्ष्मण हाकेEknath Shindeएकनाथ शिंदे