शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चासकमानच्या पाण्याला आहे का कुणी वाली?

By admin | Updated: January 14, 2017 03:16 IST

चासकमान धरणातून डाव्या कालव्यास ५०० क्युसेक्सने ५० दिवसांसाठी पाण्याचे आर्वतन कालपासून सोडण्यात आले आहे

दावडी/चासकमान : चासकमान धरणातून डाव्या कालव्यास ५०० क्युसेक्सने ५० दिवसांसाठी पाण्याचे आर्वतन कालपासून सोडण्यात आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात धरणात पाणी शिल्लक राहते की नाही ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. चासकमान धरणाला कोणी वाली आहे का नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पाण्याची गरज नसतानासुद्धा २७ दिवसांतच पाण्याचे दुसरे आवर्तन सोडल्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे. हे सोडलेले पाण्याचे आवर्तन कमी दिवसांचे करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.खेड व शिरूर तालुक्याला चासकमान धरण वरदान ठरले आहे. रब्बी हंगामासाठी चासकमान धरणातून डाव्या कालव्यास पाण्याचे दुसरे आवर्तन कालपासून सोडण्यात आले आहे. मागील रब्बी हंगामासाठी सोडलेले पाण्याचे आवर्तन ४० दिवसांचे होते, ते (डिसेंबर २०१६) मधील १८ तारखेला बंद करण्यात आले होते. तिन्हेवाडी, बुट्टेवाडी, भांबुरवाडी, टाकळकरवाडी, खरपुडी, रेटवडी, दावडी, निमगाव तसेच शिरूर तालुक्यांतील गावांना पाण्याची गरज नसताना पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाण्याचे आवर्तन पन्नास दिवसांचे आहे. टेल टू हेड या पद्धतीने या पाण्याचे वाटप होणार आहे. शिरूरसाठी २७ दिवस व खेडसाठी २३ दिवस या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारीपर्यंत हे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होणार आहे.शेतकऱ्यांची पाणी सोडावी अशी कुठलीही मागणी नसताना डाव्या कालव्यातून पन्नास दिवस पाणी सुरू राहिल्यास पाण्याची मोठया प्रमाणात नासाडी होणार आहे. धरणात ७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याची गरज नसताना अशीच नासाडी सुरू राहिल्यास ऐन उन्हाळयात धरणात पाणी शिल्लक राहील का, असा प्रश्न शेतकरी विचारु लागला आहे. पन्नास दिवसांचे सोडलेले पाण्याचे आर्वतन कमी दिवसांचे करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. सध्या या परिसरात विहिरीची पाण्याची पातळी टिकून आहे. खरपुडी, वाटेकरवाडी, निमगाव, शेलपिंपळगाव येथील बंधाऱ्यांत मुबलक प्रमाणात पाणी आहे. सध्या या परिसरात कांदा, व बटाटा, ज्वारी ही पिके काढणीस आली आहे. त्यामुळे या पिकांना पाण्याची गरज नसल्याचे शेतकरी सांगत आहे.